भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून खालापूर तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार

 भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून खालापूर तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार 





पाताळगंगा न्यूज : दीपक जगताप 
खालापूर : १३ नोव्हेंबर,

                 उत्तर रायगड जिल्हा भाजपच्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, यांच्या हस्ते व लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली खालापूर तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा  उलवे नोड रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये सत्कार करण्यात आला.
                 देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी भाजपला मोठी ताकद दिली आहे, त्यानुसार २०२४  मधील महाविजायच्या दिशेने आपल्याला वाटचाल करायची आहे. येणारी प्रत्येक निवडणूक जिंकण्यासाठी लढायची आहे ह्या दृष्टीने सतत कार्यरत रहा असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. 
                    नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकी मध्ये भारतीय जनता पक्षाने घवघवीत यश संपादन केले आहे त्या अनुषंगाने ग्रुपग्रामपंचायत बोरगाव थेट सरपंच जागृती प्रवीण मोरे, वरोसे आंबेवाडी थेट सरपंच पार्वती सुनील भस्मा , इसांबे थेट सरपंच हिरामण राघो हिलम यांचा सन्मान करण्यात आला.
              तसेच खालापूर तालुक्यातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत खानाव शशिकला मनोहर चव्हाण,ग्रामपंचायत माणकीवली उषा नरेश रसाळ,प्रज्ञा परेश देशमुख,ग्रामपंचायत आत्करगाव रोहिणी अनिल देशमुख,ग्रामपंचायत जांभीवली,वैजयंता पदमाकर कदम,ग्रामपंचायत बीड खुर्द,लवेश पुंडलिक कर्नूक,ग्रामपंचायत शिरवली
संदिप मनोहर मोरे,गीता बांदल,रामदास जाधव,
ग्रामपंचायत नंदनपाडा तृप्ती दत्ताराम पाटील,
ग्रामपंचायत होनाड,वर्षा संदीप पाटील,ग्रामपंचायत तांबाटी,हरिभाऊ जाधव,पवार सुरेश कानू, इसांबे ग्रामपंचायत सचिन शिवाजी थोरवे, नम्रता गजानन शिनगारे, ज्योती विलास पाटील, वामन वाघे,मयुरी मयूर देवघरे,समीर नामदेव देवघरे, बोरगाव ग्रामपंचायत चंद्रकांत आखाडे,राम खडके,अरुणा पारधी,कमळू पारधी,ज्योती पिरकट, स्वाती काईनकर ,अतिष वारे,कोंडीबाई आखाडे,बुगी शीत, सुनील भस्मा, मनीषा भस्मा सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा  सत्कार करण्यात आला.
                ह्या सोहळ्यास मावळ लोकसभा मतदारसंघांचे निवडणूक प्रमुख आमदार प्रशांतदादा ठाकूर, आमदार महेश बालदी, उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुका मंडळ अध्यक्ष अरुणशेठ भगत, उरण तालुका मंडळ अध्यक्ष रवी भोईर, खालापूर तालुका मंडळ अध्यक्ष प्रवीण मोरे, कर्जत मंडळ अध्यक्ष राजेश भगत, कर्जत खालापूर विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे, जिल्हा उपाध्यक्ष सनी यादव, दिपक भेहरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

0 Comments

खोपोली पोलीस स्टेशनमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन