थेट सरपंच सह सदस्य, कामगार, गृहीणी,आणी जेष्ठ नागरिक यांनी बजविला मतदानांचा हक्क

 थेट सरपंच सह सदस्य, कामगार, गृहीणी,आणी जेष्ठ नागरिक यांनी बजविला मतदानांचा हक्क 





काशिनाथ जाधव : प्रतिनिधी
पाताळगंगा : २१ ऑक्टोबर, 


                  या वर्षी निवडणूका वेळेचा आभाव कमी दिवसांचा असल्यामुळे  थेट,सरपंच सह सद्स्य  करण्यासाठी मतदान हे सर्वात मोठे दान असून यांचे महत्त्व सर्वांनाच कळले असून शिवाय मतदान करण्यासाठी प्रत्येकाला विविध माध्यमातून जागृत केले जात आहे.त्याच बरोबर सोशल मिडीयांच्या माध्यमातून मतदान का करा यांचे महत्व सांगणारे व्हिडिओ सोशल मिडीयावर दाखवित असल्यामुळे तरुण,   


     
                                         वर्गामध्ये मतदान करण्याविषयी आवड तसेच कर्तव्य म्हणून सध्या पार पाडत आहे. यामुळे कामगार असो अथवा गृहीणी किंवा जेष्ठ नागरिक यांनी मतदान कले.आपण केलेल्या मतदानांतून आपल्या जिल्ह्याचा तालुक्याचा आणी गावाचा विकास होणार असून या माध्यमातून प्रत्येकांच्या मनामध्ये मतदान विषयी चांगला भाव निर्माण झाला आहे.यामुळे मतदान करण्यासाठी नागरिक घराबाहेर पडत होते.


                    आजचे राजकारण तरुणांच्या खांद्यावर आहे.रॅली तसेच सभा या मध्ये तरुण वर्गांचा समावेश मोठ्या प्रमाणात असून आज त्यांनाही मतदानांचा अधिकार आणी महत्त्व पटले आहे.राजकारण सांभाळीत नोकरी करीत असतांना आपण ही लोकशाहीला मजबूत करण्यासाठी मतदान करीत आहे.विधानसभेची निवडणूक असल्यामुळे सर्व कामगारांना सुट्टी दिली असल्यामुळे सर्व कामगार वर्गांनी मतदान केले.आपल्याला मिळालेल्या सुट्टी चा दुरूपयोग न करता प्रत्येकांनी आपले कर्तव्ये पार पाडत मतदान केले.यामुळे प्रत्येकांच्या मनामध्ये मतदान करण्याविषयी सकारात्मक बदल घडले आहे.

                    त्याच बरोबरच घरातील सर्व कामे करुन गृहीणी वर्गांनी सुद्धा आपला मतदानांचा हक्क बजवला त्याच समवेत जेष्ठ नागरिक यांनी सुद्धा आपला मतदानांचा हक्क नोंदविला 

Post a Comment

0 Comments

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चौक,देवनाव्हे येथे रक्तदान शिबीर,भारतीय जनता पार्टी पुढाकार,