मराठी रंगभूमी दिनानिमित्त आप तर्फे खोपोली येथील नाट्यगृहास भावपूर्ण श्रद्धांजली..

 मराठी रंगभूमी दिनानिमित्त आप तर्फे खोपोली येथील नाट्यगृहास भावपूर्ण श्रद्धांजली..




पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
खोपोली : ५ नोव्हेंबर, 

              खोपोली येथील छत्रपती शाहू महाराज नाट्यगृहाची झालेली दयनीय अवस्था खोपोलीचे दुर्दैव आहे.तमाम कलारसिकांचे मन आजही यामुळे विषण्ण आहे.डोळ्यात प्राण साठवून पुन्हा एकदा प्रेक्षक, कलाकार खोपोली रंगभूमीची आतुरतेने वाट
पाहत आहेत.कधी संपेल हा प्रतिक्षेचा दुष्काळ ? या प्रतीक्षेत सर्व जण आहेत..खोपोली येथे मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून नाट्यरसिकांना, कलाकारांना आवाहन करुन जुन्या नाट्यगृहास श्रद्धांजली वाहण्यात आली व लवकरच नाट्यगृह नव्याने उभे राहील यासाठी प्रार्थना करण्यात आली 
     

          डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समोर,खोपोली येथे पार पडलेल्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमात खोपोलीकरांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला.
यावेळी जुन्या नाट्यगृहाच्या अवस्थेस प्रशासन जबाबदार आहे हे सांगताना नाट्यगृहातील वस्तू चोरून नेणाऱ्या चोरांचा तपास करून त्यांना शिक्षा द्यावी असे आप चे जिल्हाध्यक्ष डॉ.शेखर जांभळे यांनी विशद केले.यावेळी आपचे खोपोली शहराध्यक्ष ग्यासुद्दिन खान, दिपक कांबळे,चंद्रप्रकाश उपाध्याय,मैनुद्दिन खान,भगवान पवार,किशोर पानसरे,कैलास गायकवाड उपस्थित होते. डॉ. शेखर अलका तुळशीदास जांभळे
जिल्हाध्यक्ष ( रायगड जिल्हा )
आम आदमी पार्टी

Post a Comment

0 Comments

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चौक,देवनाव्हे येथे रक्तदान शिबीर,भारतीय जनता पार्टी पुढाकार,