धामधुमीनंतर आता उमेदवारांची धाकधूक ;उद्याचा दिवस ठरेल उमेदवारांचे भवितव्य

 धामधुमीनंतर आता उमेदवारांची धाकधूक ;उद्याचा दिवस ठरेल उमेदवारांचे भवितव्य



पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
खालापूर  : ५ नोव्हेंबर

             गेल्या पंधरा दिवसांपासून ग्रूप ग्राम पंचायतीच्या निवडणूक प्रचाराच्या धाम धुमिनंतर रविवारी  मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार.त्यामुळे आता सर्वांचे लक्ष्य वेधले ते जनतेतून थेट सरपंच कोण निवडून येणार? याकडे लक्ष्य लागले असल्यामुळे रिंगणात उभे असलेले सरपंच तसेच सदस्य यांची  धाकधूक सुरू झाली.असून ग्राम पंचायतीच्या निवडणूकी मध्ये  कोण विजयी होणार कोणता पक्ष आघाडीवर असेल या सर्वच चर्चांना वेग आला आहे.खालापूर तालुक्यातील २२ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीन सज्ज झाली असून आज सकाळ पासून सुरू होणाऱ्या मतदान प्रक्रियेत जवळपास ५६ हजार मतदार,  २२ सरपंच आणि १५३  सदस्य पदाच्या उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरविणार असल्याने संपूर्ण तालुक्याचे लक्ष निवडणूकीकडे लागले आहे
                काही सोबत आघाडी तर काही ठिकाणी युती तर काही स्वबळावर निवडणुका लढवित निर्णय घेतला.त्यामुळे खालापूर तालुक्यात ग्राम पंचायतीची निवडणूका सर्वच मतदारसंघांत बहुरंगी लढत पाहावयास मिळाल्या.होत्या परंतू मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे आता सर्वांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले आहे. सोमवारी  ६  तारखेला मतमोजणीच्या प्रक्रियेनंतर कोणाचा विजय झाला हे स्पष्ट होणार आहे.
        तोपर्यंत उमेदवारांची धाकधूक सुरू राहणार आहे.मतदान केंद्राबाहेर असलेली गर्दी, कोणता समाज मोठय़ा संख्येने मतदानाला घराबाहेर पडला, त्या मतदारसंघाची राजकीय स्थिती याचे आखाडे बांधत मतदारांमध्ये आता शहराचा आणी ग्रामीण भागाचा प्रभाग असलेल्या मतदारसंघांत विजयाची बाजी कोण मारणार? या चर्चांना वेग आला आहे. परंतू या चर्चांना सोमवारी निकालानंतरच ब्रेक लागणार आहे.

Post a Comment

0 Comments

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चौक,देवनाव्हे येथे रक्तदान शिबीर,भारतीय जनता पार्टी पुढाकार,