रोशन देशमुख राष्ट्रवादी युवक कॉग्रेस खालापूर तालुका सरचिटणीस पदी केली निवड,पक्ष प्रवेश

 राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात केला युवा नेतृत्व रोशन देशमुख यांनी प्रवेश.....राष्ट्रवादी युवक कॉग्रेस खालापूर तालुका सरचिटणीस पदी केली  निवड 

       

 पाताळगंगा न्यूज : दत्तात्रय शेडगे 
खालापूर : नोव्हेंबर 

  
                 राष्ट्रवादी  युवक कॉग्रेस  पक्षाच्या( अजितदादा गट) खालापूर तालुका सरचिटणीस पदी तरुण नेतृत्व रोशन देशमुख यांची नुकतीच निवड करण्यात आली, 
              राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचा अजित दादा गट हा भाजप सोबत  गेल्याने राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष हा दोन गटात विभागाला गेला, अजित पवार यांच्या सोबत अनेक आमदार  आणि खासदार गेल्याने अजित पवार यांची जोरदार ताकद वाढली असून रायगडचे खासदार सुनील तटकरे अजित पवार यांच्यासोबत आहे, त्यामुळे रायगड जिल्ह्यासह कर्जत खालापूर मतदार संघात राजीपचे माजी उपाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष वाढविण्यासाठी जोरदार पर्यन्त चालू आहेत 
               त्यातच आतकरगाव ग्रामपंचायतची निवडणूक चालू असताना आडोशी गावचे युवा नेतृत्व रोशन देशमुख यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात प्रवेश करून त्यांना राष्ट्रवादी युवक कॉग्रेस खालापूर तालुका सरचिटणीस पदी निवड करण्यात आली. ही निवड राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे नेते खासदार सुनील तटकरे यांच्या आदेशाने रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकरभाऊ घारे यांच्या मान्यतेने जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे यांच्या नेतृत्वाखाली  रोशन देशमुख यांनी प्रवेश करून  त्यांची नुकतीच निवड करण्यात आली , 
               रोशन देशमुख यांच्या निवडीने साजगाव विभागात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाची ताकद वाढली असून याचा फायदा आगामी काळात पक्षाला चांगला होणार आहे

Post a Comment

0 Comments

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चौक,देवनाव्हे येथे रक्तदान शिबीर,भारतीय जनता पार्टी पुढाकार,