आदिवासी महिलांना २०० साड्या वाटप,संतोष शिंगाडे यांचा पुढाकार

 मुंबा देवी ट्रस्ट आणि द्वारकाधीश चॅरिटीज ट्रस्टच्या वतीने आदिवासी महिलांना २०० साड्या वाटप,सामाजिक कार्यकर्ते संतोष शिंगाडे यांच्या प्रयत्नांना यश 



पाताळगंगा न्यूज : दत्तात्रय शेडगे 
खालापूर : १२ नोव्हेंबर,

                   पनवेल तालुक्यातील  दुर्गम सारसई भागातील  आदिवासी महिलांना मुंबा देवी ट्रस्ट मुबंई आणि द्वारकाधीश चॅरिटीज मुबंई यांच्या वतीने २०० महिलांना साड्या वाटप करून दिवाळी साजरी करण्यात आली, 
                 सारसई हा दुर्गम भाग असून येथे आदिवासी आणि ठाकूर समाजाची लोकवस्ती मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते संतोष  शिंगाडे हे त्या भागातील आदिवासी जनतेला न्याय देण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात ,त्याच्याच प्रयत्नाने हाही उपक्रम राबविण्यात आला, 
              मुंबा देवी ट्रस्ट मुबंई आणि द्वारकाधीश चॅरिटीज आपटा फाटा यांच्या वतीने आपटा ग्रामपंचायत हद्दीतील सारसई भागातील गरीब २०० महिलाना  साड्या वाटप करून सामाजिक बांधिलकी जपत त्यांच्या सोबत दिवाळी साजरी करण्यात आली, यावेळी  संस्थेचे सदस्य आनंद देशमुख , गोगटे काका, मीनाताई पवार, दिशा केणी ,  सामाजिक कार्यकर्ते संतोष शिंगाडे, ग्रामपंचायत सदस्या मनीषा वाघे, कृष्णा वाघे , दामू वाघे , कानू वाघे,  आदींसह   अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चौक,देवनाव्हे येथे रक्तदान शिबीर,भारतीय जनता पार्टी पुढाकार,