भारतीय जनता पार्टीच्या जन आंदोलन निवेदनाचा प्रभाव कर्जत चौक रस्त्यावरचे खड्डे भरायला सुरवात...

 भारतीय जनता पार्टीच्या जन आंदोलन निवेदनाचा प्रभाव कर्जत चौक रस्त्यावरचे खड्डे भरायला सुरवात...




पाताळगंगा न्यूज : दीपक जगताप                             खालापूर : १२ नोव्हेंबर,

               भारतीय जनता पार्टी कर्जतच्या वतीने बुधवार दिनांक ८  नोव्हेबर रोजी  कर्जत चौक रस्त्यावरील खड्डे  भरण्यासाठी कार्यकारी अभियंता पनवेल  यांना भाजप नेते सुनिल गोगटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निवेदन होते.ही बातमी पाताळगंगा न्यूज ने प्रकाशित केली,आणि खड्डे न भरल्यास तीव्र जनआंदोलन करू असा इशारा दिला , कार्यकारी अभियंता रुपाली पाटिल यांनी एक दोन दिवसात खड्डे भरण्यास सुरुवात करू असे आश्वासन दिले होते.                                                             आज या मार्गावरिल खड्डे भरण्यास सुरवात झाली.प्रशासन आणि ठेकेदार यांच्या निष्क्रियते मुळे आमचे सरकार आणि  बांधकाम मंत्री यांची  विनाकारण  बदनामी ,तसेच सर्व नागरिकांना प्रचंड त्रास होऊन कंबर दुखी ,पाठ दुखी सारखी दुखणी  होत होती.त्यामुळेच आम्हाला जन आंदोलन करण्याचा इशारा द्यावा लागून काम करून घ्यावे लागले असे  प्रतिपादन सुनील गोगटे यांनी केले .                                                                         खड्डे भरायला सुरवात झाल्याने सर्व नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. यामुळे सर्व नागरिक भारतीय जनता पार्टी आणि सुनील गोगटे यांचे विशेष आभार मानत आहेत.

Post a Comment

0 Comments

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चौक,देवनाव्हे येथे रक्तदान शिबीर,भारतीय जनता पार्टी पुढाकार,