अहिल्यादेवी ट्रस्टने केली रामदास नांगरे यांना वैद्यकीय मदत

 अहिल्यादेवी  ट्रस्टने केली  रामदास नांगरे यांना वैद्यकीय मदत


    
माय मराठी न्युज :  दत्तात्रय शेडगे 
खोपोली : १६ जानेवारी 

             सांगली जिल्हातील  वाळवा तालुक्यातील हुबालवाडी  येथील रहिवासी असलेले रामदास नांगरे हे मोलमजुरी  आणि रोजंदारी करत असून ते गावच्या लगत असलेल्या कृष्णा नदीच्या कडेला असलेली मोटर चालू करण्यासाठी गेले असता परत  येत असताना तिथे नाल्यात पडून होऊन त्यांच्या गुडघ्याची वाटी  फ्रॅक्चर झाली व त्यांच्या मांडीचे हाड मोडले डॉक्टरांनी लाखो रुपये खर्च सांगितले.त्यांना मदतीचा हात म्हणून अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टने  वैद्यकीय उपचारासाठी मदत केली.
          त्यांचा अपघात झाल्यांचे कळताच मित्रानी ॲम्बुलन्स मध्ये घालून आष्टा मल्टीस्पेशलिस्ट  हॉस्पिटल येथे  ऍडमिट करून ऑपरेशन झाले  साधारण वीस दिवस हॉस्पिटलमध्ये ऑपरेशनचा खर्च साधारण एक लाख ते दीड लाख एवढा खर्च झाला.त्यांची पती पत्नी दोघेही मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह  करुन कुटूंब चालवत आहे एवढा खर्च करताना त्यांना  मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले आहे.
            त्यांची मोठी मुलगी एमपीएससी चा अभ्यास करत आहे व मुलगा बारावी सायन्सला आहे अशा या परिस्थितीत त्यांचे वर खर्च भागवणे अवघड झाले आहे याची दखल त्यांच्या दोन्ही मुलांना शिक्षणासाठी  सर्वोतोपरी सहकार्य  केले जाईल.असे आश्वासन ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे  महाराष्ट्र  प्रदेशाध्यक्ष व अहिल्यादेवी विकास ट्रस्टचे अध्यक्षा प्रविणजी काकडे यांनी दिले आहे.    
          यावेळी उपचारासाठीचा धनादेश देताना प्रवीण काकडे श्रीमती इंदुमती काकडे संतोष हुबाले भिमराव भिसे रुपाली नांगरे राजश्री नांगरे ऋषिकेश नांगरे उपस्थित होते.अहिल्यादेवी  सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट ही समाजतील गोरगरिबांना आर्थिक दुर्बल घटकांतील मुलांना शिक्षणासाठी नेहमी मदत करत असते, असून सामाजिक बांधिलकी जपत गरिबांसाठी सर्वोतोपरी मदत करीत आहे.

Post a Comment

0 Comments

रायगड जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन