ग्रामविकास अधिकारी, सचिन कुराडे यांचे निलंबन, फौजदारी गुन्हासाठी गट विकास अधिकारी यांस निवेदन

 ग्रामविकास अधिकारी, सचिन कुराडे यांचे निलंबन, फौजदारी गुन्हासाठी गट विकास अधिकारी यांस निवेदन 



माय मराठी न्युज : वृत्तसेवा 
चौक : ७ ऑगस्ट,

              ग्रुप ग्राम पंचायत तुपगांव येथे ग्रामविकास अधिकारी, सचिन कुराडे यांनी केलेला भ्रष्टाचार,हा जे.एम. डेव्हलपर्स, बिल्डर यांनी ग्राम पंचायतीला अर्ज देवून आपण घरपट्टी व पाणीपट्टी कर भरले असल्यांचे नमुद केले.मात्र हा ग्राम निधीचा होत असलेला भ्रष्टाचार माहिती अधिकारी कार्यकर्ते गजानन साळवी, सुरेश गावडे यांनी आक्रमक भुमिका घेतल्यामुळे त्यांस  निलंबित करण्यांत आले.मात्र त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा या  संदर्भात खालापूर पोलीस स्टेशन व गट विकास अधिकारी यांस निवेदन देण्यांत आले.
              ग्रामविकास अधिकारी यांनी आपल्या सेवेमध्ये वासांबे ग्रामपंचायत येथे मोठ्या प्रमाणात अपहार करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला होता.मात्र गटविकास अधिकारी, पंचायत समिती खालापूर आणि मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रायगड यांनी संबंधित ग्रामविकास अधिकारी यांच्या विरुद्ध चुकीचा निर्णय  देऊन फौजदारी गुन्ह्यापासून वाचवलेले होते.मात्र आता त्यांचे निलंबन झाले असून,या मध्ये सरपंच सह सद्स्य या मध्ये सामिल असल्यांने त्यांचे आपत्र करण्यांत यावे  तसेच फौजदारी गुन्हा दाखल करण्यांत यावे असे माहिती अधिकारी कार्यकर्ते यांनी निवेदनांत नमूद केले आहे. 
          यावेळी माहिती अधिकारी कार्यकर्ते आक्रमक भुमिका घेत निवेदन देण्यांत आले.तसेच अनेक ठिकाणी ह्या निवेदनांच्या प्रत पाठविण्यांत आल्यांचे आरटीआय, फेडरेशन खालापूर तालुका, संपर्क प्रमुख ‌- सुरेश दिनानाथ गावडे, आरटीआय ,फेडरेशन खालापूर तालुका, संघटक - गजानन महादेव साळवी,  किशोर मोरे, सक्रिय कार्यकर्ता, परशुराम मिरकुटे, मधुकर गुरव, नरेंद्र पार्टी, यशवंत सकपाळ, जनार्दन पिंगळे, ॲड - समीक्षा दळवी, ॲड .एम.एम. मालकर,ॲड.जयवंत पाटील, तसेच खालापूर तालुक्यातील सर्व माहिती अधिकार कार्यकर्ते.निवेदन देण्यांसाठी उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments

सामाजिक कार्यकर्ते मारुती ज.ढवाळकर यांचा स्तुत्य उपक्रम