खेड येथे भव्य धनगर चषक ( कबड्डी स्पर्धेचे )आयोजन

   खेड येथे भव्य धनगर चषक  ( कबड्डी स्पर्धेचे )आयोजन









माय मराठी न्युज : दत्तात्रय शेडगे 
खोपोली : १५    फेब्रुवारी



          खेड दापोली, मंडणगड  आयोजित भव्य धनगर  चषकाचे (कबड्डी स्पर्धचे )आयोजन करण्यात आले.असून या स्पर्धा मंगळवारी १८  फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता चाटव तांबडवाडी ता खेड जि. रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आल्या आहेत.
         धनगर समाजातील तरुणांना क्रीडा क्षेत्रातही कलागुणांना वाव मिळण्यासाठी आणि उत्कृष्ट खेळाडू घडविण्यासाठी दरवर्षी या धनगर चषकाचे आयोजन करण्यात येत असते, या चषकाचे अनावरण गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्या हस्ते होणार आहे.
      तरी या स्पर्धेला समाज बांधवानी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन धनगर समाजाचे नेते मंगेश गोरे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments

डॉक्टरांना वैद्यकीय उपकरण ,पोलीस कार्यालयास   बॅरिकेटर्स चे वाटप