विद्युत वाहीनी पडल्यांने जांभिवली - आसरे - येथिल महिलेचा मृत्यू,ग्रामस्थ आक्रमक
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
चौक ,जांभिवली : १६ ऑगस्ट
चौक - जांभिवली येथिल येथ राहत असलेले ६३ वर्षाय सुलोचना गावडे या महिलाचा चालु विद्युत वाहीनी अंगावर पडल्यांने हिचा जागीच मृत्यू झाल्यांने या ठिकाणी काही वेळ तणावांचे वातावरान निर्माण झाले.यामुळे पुन्हा एकदा एमएसईबी भोंगाळ कारभार चव्हाट्यावर आल्यांचे निदर्शनास आले.असून त्यांचा हा हलगर्जीपणा एक महिलेच्या जिवावर बेतला असल्यांचे पहावयांस मिळाले.
मिळालेल्या सुत्राच्या माहिती नुसार पहाटे सहा च्या सुमारास सुलोचना दत्ता गावडे ही शौचालयात जात असतांना त्याच ठिकाणाहून विद्युत वाहीनी गेली होती मात्र ह्या जिर्ण झाल्यामुळे ती तुटून या महिलेच्या अंगावर पडली त्या क्षणी विजेचा शॉक लागून तीचा मृत्यू झाल्यांचे निदर्शनास आले.या संदर्भात माहिती मिळताच पोलीस प्रशासन,एमएसईबी अधिकारी, खालापूर - महादेव मुंडे,चौक शाखा अभियंता - योगेश देसाई तसेच इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर विंग,जयवंत पाटील तसेच ग्रामस्थ पंचानामे करते वेळी उपस्थित होते.
त्याच बरोबर या रस्त्यालगत असलेला विजेचा पोल पडल्यामुळे वाहतुकीचा मोठी समस्या निर्माण झाल्यांचे पहावयांस मिळाले.त्याच बरोबर अशीच घटना चौक येथे मागील १५ दिवसापुर्वी घडली भर बाजार पेठेत विद्युत वाहीनी पडली मात्र येथिल व्यापारी वर्गांनी समयसुचकता दाखवुन विज पुरवठा खंडीत करण्यांत आले होते.सध्या अनेक विज वाहक तार खराब झाल्या असून या कडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे असेच अपघात घडत असून नाहक बळी जात आहे.
चौकट
ह्या विद्युत वाहीनी जिर्ण झाल्या असून या कडे एमएसई बी सातत्याने दुर्लक्ष करीत असून असून अनेक ठिकाणी जॉईंट देण्यांत आले आहे.त्याच बरोबर ज्या घराच्या जवळून अथवा घरा वरुन गेलेल्या विज वाहीनीला सेफ्टी रबर लावण्यांत आले नसल्यामुळे हा अपघात घडला कदाचित रबर असल्यामुळे ही महिला वाचली असती
सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार : सुरेश गावडे
0 Comments