रायगड जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
चौक : १६ जानेवारी
ऐतिहासिक वारसा असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे सहकारी सरनौबत नेताजी पालकर यांचे हे जन्म गाव म्हणून प्रसिध्द आहे.दर वर्षी प्रमाणे नेताजी पालकर मंडळ, चौक' यांच्या माध्यमातून समरभुमी उंबरखिंड विजय दिनानिमित्ताने जिल्हा स्तरिय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
३६४ वा उंबरखिंड विजयदिन (२ फेब्रु २०२५) निमित्ताने जिल्हा स्तरीय खुल्या निबंध स्पर्धेमध्ये "शिवशाहीतील ऐतिहासिक स्थळे चौक व उंबरखिंड व त्यांच्या परिसराचे इतिहासातील महत्व" असून शब्दमर्यादा १००० ते १५०० असणार आहे.
तसेच (इ.६वी ते १० वी) 'छत्रपती शिवरायांचे हेर बहिर्जी नाईक व त्यांचे स्वराज्यातील योगदान' असे आहे. शब्द मर्यादा (५०० ते ६००) स्पर्धकांना प्रमाणपत्र, तसेच पहिल्या पाच क्रमांकांना स्मृतिचिन्ह, व पुस्तक स्वरूपात बक्षिसे दिली जातील.व १० फेब्रु. २०२५ पर्यंत पाठवावेत.तसेच गुण गौरव दि.२७/०२/२०२५ रोजी चौक येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होईल.
स्पर्धा प्रमुख भुषण पिंगळे (९३२६६६७४५९)
संघटक यशवंत सकपाळ रायगड भूषण , (९३२६१५३७३७) यांना पाठविण्यांचे अवाहन करण्यांत आले आहे.
0 Comments