वनविभागाच्या वतीने पाणपक्षांची प्रगणना, हेल्प फाउंडेशनचा सहभाग,खालापूर वन रक्षकांचा पुढाकार
माय मराठी न्युज : गुरुनाथ साठेलकर
खोपोली : १९ जानेवारी,
अपर प्रधान मुख्य वनरक्षक महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हिवाळी पाणपक्षांची प्रगणना करण्याकरिता १९ जानेवार हा जागतिक संस्थेने ठरविलेल्या निकषानुसार खालापूर तालुका वन विभागाने तालुक्यातील विवीध पाणस्थळावर सर्वेक्षण कार्यक्रम आयोजित करण्यांत आला.पाणस्थळावर स्थानिक प्रजाती सोबत विदेशी पक्षी निरीक्षण आणि प्रगणना करण्याकरिता वन खात्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सोबत पक्षी मित्र तसेच हेल्प फाउंडेशन सारख्या संस्थानी देखील सहभाग झाले होते.
खालापूर तालुका वनाधिकारी राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्व नियोजित सर्वेक्षण कार्यक्रमानुसार पहाटेपासून सूर्योदय झाल्यानंतर काही वेळ संपूर्ण महाराष्ट्रासह खालापूर तालुक्यातल्या पाणस्थळावर पक्षी निरीक्षण करून नोंद कऱण्यात आली.
0 Comments