लाडकी बहीज योजनेचे पैसे नको रे बाबा ! महिला वर्गामध्ये नाराजीचा सुर

 लाडकी बहीज योजनेचे पैसे नको रे बाबा !                       महिला वर्गामध्ये नाराजीचा सुर 



माय मराठी न्युज : वृत्तसेवा 
खोपोली : १९ जानेवारी 

         मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गेली सहा महिने राबवित असल्यामुळे बहिणांच्या खात्यात पैसे येत असून त्यांच्या आनंदाचे वातावरण निर्माण झाले.विधान सभेच्या निवडणूकीच्या अगोदर सर सकट महिला वर्गांस १५०० रुपये खात्यात जमा केले जात होते.मात्र आता काही अटी,शर्थी घातल्या जात असल्यांचे बोलले जात आहे.यामुळे अनेक महिला वर्ग अपात्र ठरतील की काय ? यामुळे महिला वर्गामध्ये नाराजीचा सुर उमठत आहे.
            लाडकी बहीण योजना सुरु झाली यावेळी महिला वर्गामध्ये चैतन्य निर्माण झाले होते.काही दिवसामध्ये त्यांच्या बॅंक खात्यात रक्कम सुद्धा येवू लागल्यावर आनंद निर्माण झाले होते.मात्र आता महिला वर्गांचे बॅंक खाली होणार की काय अशी चर्चा महिला वर्गामध्ये निर्माण झाली आहे. अटी शर्ती ठेवायच्या होत्या तर लाडकी बहीण योजना अमलात आनली नाही पाहिजे होती.मात्र आपण अपात्र ठरलो भाऊ पैसे परत तर घेणार नाही ना? या विचारांने महिला वर्ग चिंताग्रस्त झाल्या आहेत.यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे नको रे बाबा ! अशी म्हण्यांची वेळ बहीणीवर आली आहे.
            निवडणूकीच्या काळात ही योजना अशीच सुरु राहील.या योजनेचा गाजा वाज्या करण्यांत आला.मात्र  निवडणूका झाली आणी वारे फिरले.मता साठी आमच्या बरोबर बहीणींचे नाते जोडले असा संतप्त सवाल लाडकी बहीण करीत आहे.मात्र आता भाऊ चे हात वर पोहचे आणी लाडकी बहीण सध्या संकटात सापडली आहे. आता हेच पैसे बहिणी वर्गांसाठी डोकेदु:खी झाली असल्यांचे बोलले जात आहे.

Post a Comment

0 Comments

कंपनी कामगारांना धमकावत असेल तर त्या मॕनेजमेंटला पण वठणीवर आणण्याची ताकद आमच्यात आहे -  आमदार प्रशांत ठाकुर