मुबंई पुणे एक्सप्रेसवरील मिसिंग लेनला वीर हुतात्मा शिंग्रोबा धनगर नाव द्या - आमदार गोपीचंद पडळकर यांची मुख्यत्र्यांकडे मागणी

 मुबंई पुणे एक्सप्रेसवरील मिसिंग लेनला वीर हुतात्मा शिंग्रोबा धनगर नाव द्या - आमदार गोपीचंद पडळकर यांची मुख्यत्र्यांकडे मागणी



माय मराठी न्युज : दत्तात्रय शेडगे 
खोपोली : ३० जानेवारी,

             मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील  बोरघाटात नव्याने तयार करण्यात आलेल्या मिसिंग लेन( नवीन बोगद्याला )वीर हुतात्मा शिंग्रोबा  धनगर बोगदा असे नाव देण्यात यावे  अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
             इंग्रजाच्या काळात  बोरघाटातून मार्ग  इंग्रजाना मार्गे दाखविणारे  आणि मुंबई पुणे जुन्या महामार्ग बोरघाटाचे जनक म्हणून वीर  हुतात्मा शिंग्रोबा धनगर यांना ओळखले जाते.त्यांचे सदैव स्मरण व्हावे यासाठी बोरघाटात वीर हुतात्मा शिंग्रोबा देवाचे मंदिर  बांधण्यात आले आहे.तेथून जाताना प्रत्येक वाहन चालक क्षणभर आपले वाहन थांबवून वीर शिंग्रोबाला नतमस्तक होऊनच पुढे जातो.
         असा या महान हुतात्म्याचे सदैव स्मरण व्हावे आणि त्यांच्या आठवणींना उजाळा मिळावा यासाठी मुबंई पुणे एक्सप्रेसवेवर  बोरघाटात नवीन  तयार करण्यात आलेल्या मिसिंग लेनला  वीर हुतात्मा शिंग्रोबा बोगदा  असे नाव देण्यात यावे अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे,
       
------------प्रतिक्रिया------------ 
मुबंई पुणे एक्सप्रेसवेवरील बोरघाटात नव्याने तयार करण्यात येणाऱ्या मिसिंग लेनला वीर हुतात्मा शिंग्रोबा धनगर असे नाव देण्यात यावे अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर साहेबांकडे केली होती त्या मागणीची आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी दखल घेऊन ती मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे  पत्राद्वारे केल्याने आम्ही त्यांचे आभारी आहोत 
     मा.सदस्य - ग्रामपंचायत आत्करगाव तथा धनगर समाज युवा नेते : दत्तात्रय शेडगे

Post a Comment

0 Comments

संतोष शिंगाडे यांना आरडीसी बॅंक च्या वतीने जिल्हा स्तरीय पुरस्कार जाहिर