नैसर्गिक नाला बनले गटार,शेती व नागरी वस्तीत सांडपाणी अखेर खालापुर येथे आमरण उपोषण सुरु

 नैसर्गिक नाला बनले गटार,शेती व नागरी वस्तीत सांडपाणी अखेर खालापुर येथे आमरण उपोषण सुरु 




माय मराठी न्युज : वृत्तसेवा 
खालापूर : २६ जानेवारी,


           चौक व तुपगाव या दोन्ही ग्रुप ग्राम पंचायत  नैसर्गिक नाल्यात,सांडपाण्यांचे स्वरुप दिल्यामुळे येथिल स्वच्छतेचे तीन तेरा वाजले आहेत.यामुळे त्यांच्या आरोग्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असतांना, गेली दोन वर्ष सातत्याने सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवले असतांना  ग्रुप ग्राम पंचायत व शासकीय अधिकारी कोणतीही भुमिका घेत नसल्यामुळे अखेर २६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनांच्या निमित्ताने सरनौबत नेताजी पालकर सभागृह, तहसील कार्यालय खालापूर येथे आमरण उपोषणांचे हत्यार उपसले आहे.
           ग्रुप ग्राम पंचायत नेहमी नागरिकांच्या समस्या अथवा विविध माध्यमांचा दुवा असून ते सोडविण्यांसाठी तप्तर असते.मात्र येथिल बिल्डर च्या सहमताने या परिसरात सध्या घाणींचे गटारांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.मागील दोन वर्षापासून या होणा-या त्रासापासून सुटका करावी,शेती नुकसान टाळावे,नैसर्गिक नाल्यांला गटारांचे स्वरुप मिळू नये यासाठी सातत्यांने निवेदन देवून सुद्धा चौक,तुपगांव पाली (खु.) येथिल ग्रामस्थांना केराची टोपली दाखविली जात आहे.
          येथिल ग्रामस्थांना,शेतकरी बांधवांना न्याय मिळत नाही तो पर्यंत हे आमरण उपोषण असेच सुरु राहणार असल्यांचे या ठिकाणी ठिय्या मांडलेल्या ग्रामस्थांनी व्यक्त केले.जो पर्यंत आमच्या मान्य होत नाही,आणी हा परिसर स्वच्छता मुक्तीचे लेखी अश्वासन मिळत नाही तो पर्यंत आमचे संघर्ष सुरुच राहणार असल्यांचे यशवंत सकपाळ आणि अमोल सकपाळ ,जनार्दन म्हस्के कोंडीलकर,वैभव पवार, रुपाली शिंदे, मधुकर गुरव, अरुण घोडके, पंकज शहा, कीर्ती शहा, हेमंत माने, अजिंक्य चौधरी, दत्तात्रय मालुसरे, सचिन सकपाळ, स्वप्नील सोनटक्के ॲड.रीना सोनटक्के,बाळू पारठे,राजा पवार,संदीप पाराठे यांनी प्रतिनिधी शी बोलतांना व्यक्त केले.


Post a Comment

0 Comments

राजिप शाळेतील विद्यार्थी गिरवणार डिजिटलचे धडे