जेएसडब्लू स्टील कंपनीतील कंत्राटी कामगारांना मिळवून दिली ग्रॅज्युएटी, संघटित असंघटित कामगार फ्रंट युनियनला पुढाकार
माय मराठी न्युज : दत्तात्रय शेडगे
खोपोली : १८ जानेवारी,
खालापूर तालुक्यातील पालीफाटा येथे असलेल्या जेएसडब्लू स्टील कोटेड लिमिटेड या कंपनीतील कामगारांना ग्रॅज्युएटी मिळवून देण्यात संघटित असंतघटीत कामगार फ्रंटचे अध्यक्ष भगवान ढेबे यांना यश आले आहे.
या कंपनीत गेल्या अनेक वर्षांपासून अनेक कंत्राटी कामगार काम करत असून त्यांना ग्रॅज्यएटी मिळत नव्हती, त्या कामगारांनी युनियनचे अध्यक्ष भगवान ढेबे यांची भेट घेत न्याय मिळवून देण्याची विनंती केली, त्यानंतर भगवान ढेबे यांनी संघटित असंघटित कामगार फ्रंट यूनियनच्या माध्यमातून आवाज उठवून पत्र व्यवहार करून कंपनीत कंत्राटी पद्धतीने काम करुन ग्रॅज्युएटी साठी पात्र असलेल्या कामगारांना ग्रॅज्युएटीचा मोबदला मिळवून दिला, हा मोबदला कामगारांच्या खात्यावर जमा झाल्याने कामगार आणि त्यांच्या कुटूंबात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
कंपनी व्यवस्थापक महाजन आणि एचआर मॅनेजर मनीकांत त्रिपाठी यांनी युनियनच्या न्याय मागणीला प्रतिसाद देऊन ही मागणी माग्य केल्याने कामगारांनी कंपनी व्यवस्थापनाचे आणि संघटित व असंघटित कामगार युनियन फ्रंटचे अध्यक्ष भगवान ढेबे यांचे आभार मानले आहेत.
0 Comments