बोरिवली साईनगर,वाशिवली धनगरवाडा ग्रामस्थांना अंत्य संस्कारासाठी स्मशानभुमीचे भुमिपुजन,बांधकाम सुरु
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
वाशिवली : १७ जानेवारी,
ग्रूप ग्राम पंचयात वडगांव हद्दितील असलेली बोरिवली साईनगर,वाशिवली धनगरवाडा ह्या गावांना अंत्य संस्कारासाठी स्मशान भुमी ची मोठी समस्या निर्माण होत असल्यामुळे खासदार सुनिल तटकरे यांच्या जनसुविधा योजनेच्या अंतर्गत आणी मा.जि.प.सदस्या पद्माताई सुरेश पाटील व सुरेश पाटील यांच्या प्रयत्नातून पाताळगंगा च्या किणा-यावर या स्मशान भुमीचे भुमिपुजन करण्यांत आले.
या दोन्ही गावातील ग्रामस्थ पुर्वी या नदिच्या ठिकाणी अंत्य संस्कार करीत होते.मात्र या ठिकाणी कारखाना सुरु होत असल्यामुळे काम सुरु असून मृत व्यक्तीचे अंत्य संस्कार करण्यांसाठी मोठी समस्या निर्माण होत असल्यामुळे सुरेश पाटील यांनी कंपनी व्यवस्थापन यांच्याशी चर्चा अंती मार्ग काढून आज त्या ठिकाणी स्मशानभुमीचे भुमिपुजन करुन बांधकाम चालू करण्यांत आले.
ग्रामस्थांशी समस्या विचारात घेत आणी व्यवस्थापक यांस त्यांची समस्या सांगितली असता सकारात्मक पाउल उचलत या ठिकाणी काम सुरु झाले.यावेळी या परिसरातील ग्रामस्थ आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments