भक्ती वेदांत गोआश्रमात अखंड हरीनाम सप्ताह ,सोहळ्यास आमदार महेश बालदी यांची उपस्थिती
माय मराठी न्युज : दत्तात्रय शेडगे
खोपोली : १३ जानेवारी,
भक्ती वेदांत गोआश्रम चॅरिटेबल ट्रस्ट नाणीवली यांच्या वतीने सात दिवस अखंड हरीनाम सप्ताह सोहळा संपन्न होत असतांना उरण मतदार संघांचे आमदार महेश बालदी यांची उपस्थिती लाभली.गेली सात दिवस अखंड हरिनाम सप्ताह सुरु असतांना जिल्ह्यातील नामवंत किर्तनकारांनी आपली सेवा देली.
हा परिसर गो मातेच्या मुळे रमनिय असून त्यांचा सांभाळ केला जात आहे.त्याच बरोबर मुलांच्या वरती भक्ती मार्गाला लावून शैक्षणिक शिक्षण दिले जात आहे.शिवाय आपण स्व रक्षक झाले पाहिजे यासाठी शारीरिक दृष्ट्या सक्षम करुन लाठीकाठी, तलवार चालवणे, मैदानी खेळ आणि रणरागिणी शौर्य प्रशिक्षण देण्यात येते त्याच बरोबर राज्याबाहेरील मुले शिक्षण घेत आहेत.या ठिकाणी गाई सांभाळत असतांना चा-यांचा तुटवडा निर्माण होत असल्यामुळे दानशूर व्यक्तीने मदत करण्यांचे अवाहन दिनेश महाराज नामदेव मते यांनी केले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन भक्ती वेदांत गोआश्रम चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक हभप दिनेश महाराज मते, अध्यक्ष हभप अनंत महाराज पाटील, जयानंद काशिनाथ मते, गणेश तुकाराम माळी, दिनेश सुभाष घोगरे, चंदर दगडू धनगर (बावधाने ), दक्षता कडव, कल्पना दिनेश घोगरे, गौरी चंदर धनगर (बावधाने ) सपना दिनेश मते, जयश्री गणेश माळी, सोनिया सुभाष कडव, शंतनू कडवं, गुरुदत्त गायकर, राजू अनंत पाटील, मुरलीधर सुभाष पाटील, सचिन म्हात्रे,आदिनी विशेष मेहनत घेऊन हा हरीनाम सप्ताह पार पडला
0 Comments