ज्योतिष,वास्तु राष्ट्रीय महा अधिवेशनात महेश निमणे यांस वास्तुश्री पुरस्कारांने सन्मानित

 ज्योतिष,वास्तु राष्ट्रीय महा अधिवेशनात महेश निमणे यांस वास्तुश्री पुरस्कारांने सन्मानित 




माय मराठी न्युज : वृत्तसेवा 
खोपोली : १३ जानेवारी,
  
            खोपोली येथे असलेले महेश निमणे,यांनी गेले अनेक वर्ष  सुखी वास्तु स्पिरिचुअल सर्व्हिसेस च्या माध्यमातून अनेकांना मार्गदर्शन करीत असून हजारो व्यक्तींना उत्तम लाभ प्राप्त झाला आहे.यामुळे त्यांस नुकताच योगीराज ज्योतिष वास्तु राष्ट्रीय अनुसंधान छत्रपती संभाजी नगर ( औरंगाबाद ) येथे ८वे  महाअधिवेशनात डॉ.सीमाताई देशमुख यांच्या पुढाकारांने हॉटेल सिल्व्हर इन जालना रोड छ.संभाजीनगर येथे आयोजित करण्यांत आले होते.यावेळी निमणे यांस वास्तुश्री या सन्मानपत्र,सन्मानचिन्ह शाळ ,श्रीफळ देवून सन्मानित करण्यांत आले.
         जिवनात आपल्या वास्तु शास्त्राला खूप महत्व असून या माध्यमातून आपण आपले जिवन या मध्ये व्यतीत करीत असतो.मात्र काही वेळी आपल्याला वास्तु विषयी वेगवेगळे अनुभव येत असून यासाठी आपण त्यांचे निराकरण करण्यासाठी आपण वास्तु तज्ञ यांच्या कडे जात असतो.महेश निमणे हे  वास्तु शास्त्राचा
या क्षेत्रात गुढ विज्ञान वास्तु शास्त्र,अंकशास्त्र , रेकी,लोलक शास्त्र, यात प्राविण्य मिळवलेले व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्या कडे पाहिले जात असून आजवर त्यांने अनेकांना या विषयावर मार्गदर्शन करुन कुटुंबांना सुखी समाधानी केले आहे.
             यावेळी या ज्योतिष,वास्तु राष्ट्रीय  महाअधिवेशनात डॉ. एच.एस.सावंत,नरेन उम्रीकर,निलेश कुलकर्णी,प्रदिप पंडित,अध्यक्ष - डॉ.सीमा देशमुख,उपाध्यक्ष - प.विजय कुलकर्णी,कार्याध्यक्ष - डॉ.दिलीप कुलकर्णी अदि मान्यवरांच्या उपस्थित हा सन्मान सोहळा पार पडला या कार्यक्रमात जयश्री मगगीवार यांनी साऊंड थेरपी मेडिटेशन ने मनात नवचैतन्य निर्माण करून देण्याचे काम केले.


   
             

Post a Comment

0 Comments

ज्योतिष,वास्तु राष्ट्रीय महा अधिवेशनात महेश निमणे यांस वास्तुश्री पुरस्कारांने सन्मानित