पोलीस पाटील रेश्मा रमेश ढवाळकर यांनी विद्यार्थ्यांच्या चेह-यावर फुलवले हसू,वह्या मध्ये हेल्पलाईन नंबर समावेश

 पोलीस पाटील रेश्मा रमेश ढवाळकर यांनी विद्यार्थ्यांच्या चेह-यावर फुलवले हसू,वह्या मध्ये हेल्पलाईन नंबर समावेश 





माय मराठी न्युज : वृत्तसेवा 
माजगाव आंबिवली : ३१ जानेवारी,

              लहान मुले ही देवाघरची फुले असे संबोधले जाते.मात्र या फुला सारख्या मुलांच्या मुखावरती  हास्य फुलवावे या उद्दात विचारांतून माजगांव,आंबिवली चे कार्यतत्पर असलेले पोलीस पाटील रेश्मा ढवाळकर यांनी रायगड जिल्हा परिषद शाळा माजगाव येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांस शैक्षणिक साहित्य समवेत खावू वाटप करुन मुलांच्या चेह-यावर हास्य झळकले पहावयांस मिळाले.
          विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करतांना ज्या वह्या वाटप करण्यांत आले त्यांच्यावरती चाइल्ड हेल्पलाईन नंबर देण्यांत आले.कोणत्याही स्थितीत काही समस्या निर्माण झाल्यांस आपणांस त्यांची माहिती असावी या विचारांतून खालापूर पोलीस स्टेशनचे अधिकारी यांची नावे व संपर्क क्रमांक हा उपक्रम हाती घेण्यांत आले.खालापूर पोलीस च्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधून तालुक्यातील असलेल्या अनेक शाळेमध्ये जावून आपतकालीन स्थिती निर्माण झाल्यास नंबर देण्यांत उपक्रम हाती घेतले गेले आहे.
             यावेळी पोलीस पाटील रेश्मा ढवाळकर बोलतांना म्हणाले की रूपाली ढवाळकर ही सुद्धा माजगाव शाळेचीच माजी विद्यार्थी असून ती  इंजिनियर म्हणून नामांकित कंपनीमध्ये कामं करीत आहे. मराठी शाळेत शिक्षण घेवून आपल्या शाळेचं नाव अभिमानांने सांगत आहे.यावेळी रमेश ढवाळकर मुख्याध्यापक - किरण कवाद, रेखा जाधव, भूषण पिंगळे, अर्चना शेलार हे शिक्षक उपस्थित होत.


Post a Comment

0 Comments

विक्रम गायकवाड यांस प्रेस मिडीया लाईव्ह कोल्हापूर येथे समाज रत्न पुरस्करांने सन्मानित