समरभूमी उंबरखिंड येथे ३६४ वा विजयदिन सोहळ्याचे आयोजन
माय मराठी न्युज : दत्तात्रय शेडगे
खोपोली : ३१ जानेवारी,
खालापूर तालुक्यातील छावणी (चावणी ) येथे समरभूमी उंबरखिंड येथे ३६४ व्या विजयदिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.हा विजयदिन सोहळा रविवार दिनांक २ फेब्रुवारी आयोजित करण्यात येणार आहे.
सकाळी शिवभूषण,तथा रायगड भूषण शिवशाहीर वैभव घरत, यांचा मराठामोळी पोवाडा, व स्फूर्ती गीत प्रबोधनकार शाहिरी कार्यक्रम, होणार आहे तर शिवव्याख्याते शिरीष महाराज मोरे यांचे व्याख्यान होणार आहे.छत्रपती शिवाजी महाराजांनी समरभूमी उंबरखिंड येथे कारलतलब खानाच्या असंख्य मुघल सैनिकांवर महाराजांनी मूठभर मावळे घेऊन मोठा विजय मिळवला होता.
त्यांचे स्मरण आणि आठवणींना उजाळा मिळावा यासाठी समरभूमी उंबरखिंड येथे ग्रामस्थ, ग्रामपंचायत चावणी, पंचायत समिती खालापूर आणि.जिल्हा परिषद रायगड,आणि शिवदुर्ग मित्र मंडळ लोणावळा यांच्या वतीने दरवर्षी मोठ्या उत्साहात विजयदिन सोहळा साजरा करून विजय स्तंभाला अभिवादन करण्यात येते असते.या सोहळ्यास शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन चावणी ग्राम पंचायतचे सरपंच बाळासाहेब आखाडे यांनी केले आहे.
0 Comments