थरमॅक्स चे १६ कामगारांचे आमरण उपोषण सुरु,घरातील सदस्य,सह राजकीय नेत्याचा सहभाग
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
पौध : १६ जून,
गेली अनेक वर्ष पौध गावानजिक असलेला थरमॅक्स कारखान्यातील १६ माथाडी कामगारांस व्यवस्थापक यांनी घरचा रस्ता दाखविल्यामुळे पुन्हा एकदा आमरण उपोषणाचे हत्यार उपसावे लागले,सकाळी ९ वाजता हे उपोषण सुरु झाल्यामुळे घरातील सदस्य सह राजकीय नेत्यांचा पाठींबा पहावयांस मिळत आहे.जो पर्यंत आम्हाला कामावर घेत नाही तो पर्यंत आमचे आंदोलन हे असेच सुरु राहणार असल्यांचे कमिटी मेंबर यांनी सांगितले.
२६ मे ला गेट समोर आमरण उपोषण सुरु केले.व्यवस्थापक आणी कामगार नेते संतोष बैलमारे यांच्या मध्यस्तीने आंदोलन स्थगिती करून कामगारांना लवकरात लवकर कामावर घेण्यांत येईल असे आश्वासन व्यवस्थापक यांनी उपोषण कर्त्यास दिले.यामुळे उपोषण तुर्तास स्थगिती करण्यांत आले होते.मात्र १५ दिवसानंतर व्यवस्थापक यांची भुमिका संशासस्पद असल्यामुळे पुन्हा एकदा १६ जून ला थरमॅक्स गेट जवळ आमरण उपोषणास बसावे लागत असल्यांची खंत कामगारांनी व्यक्त केली.
गेले २२ वर्ष या कारखान्यात आम्ही १६ कामगार माथाडी म्हणून काम करीत होते.मात्र आम्हाला कोणतीही पुर्व सुचना न देता आम्हाला घरचा रस्ता दाखविला,यामुळे गेले अडीच महिने आम्ही घरीच असल्यामुळे अर्थिक बजेट कोलमडले आहे.जो पर्यंत आम्हाला कामावर घेत नाही तो पर्यंत हे आमरण उपोषण सुरु राहणार असल्यांचे निवृती पवार,निलेश शिंदे,राजू पाटील,संजय ठोंबरे,रुपेश ठोंबरे,प्रकाश पाटील,ज्ञानेश्वर पाटील,चंद्रकांत गोंधळी,कृष्णा ठाकूर,सदानंद भालिवडे,हनुमंत पवार,नितिन पाटील,दिपक फराट,महेंद्र पाटील,रमेश फराट,दिनेश ठोंबरे यांनी प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.
0 Comments