स्नेहमेळाव्यात शालेय जीवनातील आठवणीत रमले वर्गमित्र
माय मराठी न्युज : समाधान दिसले
खालापूर : १५ जून,
जुने मित्र, त्यांच्यासोबत शिकत असताना घडलेले गमतीदार किस्से, शिक्षण घेत असताना काढलेल्या एकमेकांच्या खोड्या, झालेली भांडणे रुसवे, फुगवे या साऱ्या आठवणीत "ते’ रमले. निमित्त होते, परळ येथील सोशल सर्व्हिस लीग विद्यालयात घेण्यात आलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याचे. हा स्नेहमेळावा मुंबई मधील परळ येथील सोशल सर्व्हिस लीग हायस्कूलमध्ये संपन्न झाला असून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपति शिवाजी महाराज व भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून स्नेहमेळाव्याला सुरुवात करण्यात आली होती.
तब्बल २५ वर्षांनंतर सर्व वर्गमित्र परत एकाच मंचावर आले होते. धकाधकीच्या जीवनातून १९९४ - २००० बॅचमधील पाचवी ते दहावीमधील माजी विद्यार्थ्यांनी एकमेकांशी संपर्क साधून स्नेहमेळावा घेतला, त्यासाठी त्यावेळचे सर्व वर्गमित्र व शिक्षकांना आमंत्रित करण्यात आले होते. शाळेच्या इमारतीत माजी विद्यार्थी व शिक्षकांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाला माजी मुख्याध्यापिका सातवे मॅडम, माजी मुख्याध्यापिका कॉन्ड्रा - पवार मॅडम तसेच शाळेचे मुख्याध्यापक तांबे सर,मराठी शिक्षिका शेळके - पाटील मॅडम, विद्यार्थ्यांच्या आवडत्या वर्ग शिक्षिका व विज्ञान शिक्षिका भांगरे - तळपे मॅडम ह्या प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते. तसेच या स्नेह मेळाव्यात निधन झालेल्या मित्र आणि शिक्षकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत त्यांच्या आठवणींनी उजाळा दिल्याने सर्व मित्र - मैत्रिणींचे डोळे पाणावले होते.
0 Comments