झेनिथ वॉटर फॉल येथील दुर्घटना रोखण्यासाठी उपाय योजनांना सुरुवात,

 झेनिथ वॉटर फॉल येथील दुर्घटना रोखण्यासाठी उपाय योजनांना सुरुवात,


वॉटरफॉलच्या वाटेवर ठिक ठिकाणी रोप बॅरिकेडिंग 







माय मराठी न्युज : गुरुनाथ साठेलकर 
खोपोली : ३ जून,

              दरवर्षीप्रमाणे यंदाही पर्यटकांची पावले झेनिथ वॉटर फॉलच्या दिशेने वळणार हे गृहीत धरून त्या ठिकाणी होणाऱ्या दुर्घटनांवर प्रतिबंध आणण्यासाठी विविध उपाय योजना राबविण्यास सुरुवात झाली आहे. खोपोली नगर पालिका, खोपोली पोलीस स्टेशन, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था आणि स्थानिकांच्या माध्यमातून  पावसाळ्याच्या सुरुवातीलाच या ठिकाणी उपाय योजना करण्यांत आली.यामुळे पावसाचा पाण्यांचा अंदाज न आल्यामुळे अपघात घडत असल्यामुळे यावरती उपाय योजना या ठिकाणी राबविण्यांत आली.
                   दरवर्षी प्रमाणे यंदाही जिल्हाधिकारी रायगड आणि रायगड पोलिस यंत्रणेच्या माध्यमातून पर्यटन स्थळांवर पर्यटकांना येण्यास मज्जाव केला जाणार, असा अंदाज जरी असला तरी कायदा पायदळी तुडवून पर्यटक हुल्लडबाजी आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी दाखल होणार आहेत हे गृहीत धरूनच खोपोली नगर परिषदेच्या अग्निशमन दलाकडून झेनिथ वॉटरफॉलच्या वाटेवर ठिकठिकाणी रोप बॅरिकेडिंग केले असून अन्य उपाययोजनाही केल्या जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ.पंकज पाटील यांनी दिली.                                               

                 खोपोली पोलिस स्टेशनच्या माध्यमातून हौशी पर्यटकांवरवर करडी  नजर ठेवली जाणार आहे आणि कोणीही नशापाणी करून त्या ठिकाणी जाणार नाही याकडे काटेकोरपणे लक्ष ठेवले जाणार असल्याची माहिती पोलस निरीक्षक शितल राऊत यांनी दिली.क्यू. आर.कोडचे फलक ठीकठिकाणी प्रदर्शित करून पर्यटकांना आपत्कालीन प्रसंगी आवश्यक असलेल्या संपर्क क्रमांकांची माहिती करून दिली जाणार आहे.त्याच सोबत रेस्क्युअर्सची टीम झिरो अवर्समध्ये आपत्कालीन प्रसंगी घटनास्थळी दाखल होणार असल्याचा विश्वास अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थे कडून (हेल्प  फाउंडेशन ) ने व्यक्त केला जात आहे.खोपोली शहरात दाखल होणाऱ्या पर्यटकांना कोणत्याही आपत्तीचा सामना करावा लागू नये याकरिता सर्वच यंत्रणा दक्ष असल्याचे दिसून येत आहे.

Post a Comment

0 Comments

संतोष शिंगाडे यांना आरडीसी बॅंक च्या वतीने जिल्हा स्तरीय पुरस्कार जाहिर