कवी बाबासाहेब कोकरे यांचे कार्य कौतुकास्पद - आमदार गोपीचंद पडळकर

 कवी बाबासाहेब कोकरे यांचे कार्य कौतुकास्पद - आमदार गोपीचंद पडळकर 



माय मराठी न्युज : दत्तात्रय शेडगे
खोपोली : ३ जून,


        मानदेशी कवी बाबासाहेब तातोबा कोकरे यांचे कार्य कौतुकास्पद असून त्यांनी नुकताच दोन  कविता संग्रह  पुस्तके  लिहिली असून त्यांचे आता तिसरे शब्दांचे फटकारे हे पुस्तकं येत असल्याने त्यांना  जत विधानसभा मतदार संघांचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
           सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील जाभुळणी या गावाचे बाबासाहेब कोकरे हे रहिवासी असून ते शेती करत असताना त्यांनी हा छंद जोपासला आहे.त्यांनी आतापर्यंत मराठीत अनेक कविता केल्या आहेत.त्यांनी आतापर्यंत तळमळ आणि इंद्रधणू ही दोन कविता संग्रहाची  पुस्तके लिहिली आहेत. त्यांना आता पर्यंत राष्ट्रीय कवी ग्रेस काव्यप्रतिभा पुरस्कार,काव्यरत्न पुरस्कार, साहित्यभूषण पुरस्कार, स्वदेशी भारत सन्मान पुरस्कार देण्यात आले.त्यांचे शब्दांचे फटकारे हे तिसरे पुस्तकं येत असल्याने त्यांना  जत विधानसभा मतदार संघांचे आमदार  गोपीचंद पडळकर यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments

संतोष शिंगाडे यांना आरडीसी बॅंक च्या वतीने जिल्हा स्तरीय पुरस्कार जाहिर