सामाजिक कार्यकर्ते ॲड.आकाश सोनावणे यांच्या पुढाकाराने जागतिक पर्यावरण दिन साजरा,डीपी रस्ता वृक्षारोपणने बहरले

 सामाजिक कार्यकर्ते  ॲड.आकाश सोनावणे यांच्या पुढाकाराने जागतिक पर्यावरण दिन साजरा,डीपी रस्ता  वृक्षारोपणने बहरले 



माय मराठी न्युज :  दत्तात्रय शेडगे
खोपोली : ८ जून,

      सामाजिक कार्यकर्ते ॲड.आकाश सोनावणे यांच्या पुढाकाराने प्रकाशनगर, मोहनवाडी डी. पी. रोड, नीलकंठ व्हॅली परिसरात जागतिक पर्यावरण दिन साजरा करून वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.यामुळे हे रस्ते वृक्ष रोपनांने हा परिसर हिरवे गार झाल्यांचे पहावयांस मिळत आहे.ॲड.आकाश सोनावणे हे गेल्या अनेक वर्षापासुन समाजउपयोगी कार्य करून सामाजिक बांधिलकी जपत आहेत.
               ॲड.आकाश सोनावणे यांनी  स्वःखर्चाने   ठिकाणी ३०० हून अधिक झाडांची लागवड करून त्यांना जोपासण्याचे काम करत आहेत, ते स्वतः ही  झाडे वाढीसाठी प्रयत्न करून काळजी घेत असून,या वृक्ष रोपणांसाठी अनेक मान्यवर उपस्थित होते,पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला, यावेळी खोपोलीचे जेष्ठ पत्रकार दिनकर भुजबळ, किरण गौतम ,उत्तम पवार, खोपोली माजी उपनगराध्यक्ष प्रकाश गायकवाड, लिब्बंन्ना निलुर, विजय सताणे, पत्रकार अमोल वाघमारे, विशाल ओव्हाळ,आकाश कांबळे, समीर माने, संजय रूपवते, रवि तेलवणे, भगवान खंडागळे, धैर्यशील जाधव, विकास सोनावणे, पत्रकार आकाश जाधव व तय्यब खान आदी मान्यवर सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments

संतोष शिंगाडे यांना आरडीसी बॅंक च्या वतीने जिल्हा स्तरीय पुरस्कार जाहिर