सुकीवली जिल्हा परिषद गटातून प्रशांत आखाडे

 सुकीवली जिल्हा परिषद गटातून प्रशांत आखाडे  इच्छुक,शिवसेना शिंदे गटातून प्रबळ दावेदार...


खोपोली- दत्तात्रय शेडगे

           रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे आरक्षण नुकतेच जाहिर झाले असून सर्वच पक्षांनी आपापले उमेदवार शोधण्याच्या तयारीत आहेत त्यातच  रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सुकीवली जिल्हा परिषद गटातून  वरवली गावचे सुपुत्र प्रशांत आखाडे यांनीही जोरदार तयारी केली आहे  ते शिवसेना शिंदे गटातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत, त्यांना सुकीवली जिल्हा परिषद  गटातून उमेदवारी द्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.                                                    रत्नागिरी जिल्हात  प्रशांत आखाडे यांचे चांगले काम असून त्यांना त्यांना जिल्ह्यात मानणारा एक मोठा गट आहे, त्या मुळे त्याचा फायदा हा पक्षाला नक्कीच होऊ शकतो.  तसेच ते गृहराज्य मंत्री  तथा आमदार योगेशदादा कदम यांचे निष्ठावंत आणि विश्वासू सहकारी आहेत,गेली अनेक वर्ष ते शिवसेना मध्ये काम करत आहेत.                                                                            नुकतेच रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या  प्रभाग निहाय आरक्षण जाहीर झाले असून  सुकीवली जिल्हा परिषद गटात  ओबीसी आरक्षण पडले आहेत त्यामुळे या गटातून सुशीक्षित आणि पदवीधर असलेले   प्रशांत आखाडे यांच्या नावाची जोरदार चर्चा असून ते या जिल्हा परिषद  गटातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत, त्यांना शिवसेना शिंदे गटातून उमेदवारी मिळावी अशी कार्यकर्त्यांची जोरदार मागणी आहे

Post a Comment

0 Comments

सुकीवली जिल्हा परिषद गटातून प्रशांत आखाडे