राजिप शाळा माजगाव येथे ध्वजारोहन,विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा,
पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा
माजगाव/ आंबिवली : १५ ऑगस्ट
रायगड जिल्हा परिषद शाळा माजगाव येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न झाला.याप्रसंगी ध्वजारोहण शाळेचे मुख्याध्यापक किरण कवाद यांच्या हस्ते झाले.यावेळीअल्काईल अमाईन कंपनी च्या माध्यमातून ७ वी मध्ये प्रथम, द्वितीय,तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यांत आले.यावेळी सरपंच दिपाली नरेश पाटील,समवेत उपसरपंच,सदस्य,ग्रामसेवक,या परिसरातील असंख्य कार्यकर्ते,ग्रामस्थ,माजी विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थी शाळेय अध्यायन करीत असतांना विविध खेळामध्ये आपले कौशल्य दाखवावे,त्यांनी विविध पातळीवर या शाळेचे गावाचे नाव उज्जवळ करावे या उद्दात विचारांतून मा.सरपंच गोपीनाथ जाधव यांनी स्व खर्चाने शाळेय क्रिया साहित्य वाटप करण्यांत आले. यावेळी स्वच्छता मॉनिटर उपक्रमांतर्गत आपले गाव स्वच्छ ठेवण्यासाठी आवाहन करण्यात आले.
दरवर्षी शिवजयंती निमित्त प्रेरणा मित्र मंडळाने केलेले वह्या वाटप,प्रायमा मेडिकल असोसिएशन रसायनी यांनी वह्या वाटप, हरि ओम चॅरीटेबल ट्रस्ट तर्फे एज्युकेशन व हेल्थ किट वाटप व हॅण्ड वॉश बांधकाम , ग्रामपंचायत माजगाव तर्फे शालेय क्रीडांगण भराव काम,या कामांबद्दल सर्व संस्थांचे आभार व्यक्त करण्यात आले, ध्वजारोहण झाल्यानंतर गावातून विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा घेऊन प्रभात फेरी काढण्यात आली,हा ध्वजारोहन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक किरण कवाद, उपशिक्षक रेखा जाधव, भूषण पिंगळे, अर्चना शेलार यांच्या मार्गदशनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.
0 Comments