इशिका शेलार रायगड पोलिसांच्या नवदुर्गा सन्मानाने सन्मानित..
पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
खोपोली/ नागोठणे : २५ ऑक्टोबर,
रायगड पोलीस यांच्या वतीने आयोजित
नवदुर्गा सन्मान सोहळा २०२३ रोजी दिनांक 25 ऑक्टोबर रोजी बालगंधर्व सभागृह,नागोठणे येथे पार पडला.
कोरोना काळात अंतिमविधी करणारी रायगड जिल्ह्यातील पहिली महिला असलेल्या इशिका शेलार यांनी कोरोणा झालेल्या रुग्णांना व नातेवाईकांना सहज सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून निःशुल्क जेवणाचे डबे पुरविताना महत्त्वाची भूमिका बजावली आहे.तर संपूर्ण महाराष्ट्रात आगळीवेगळी ठरलेली विटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी चालवलेली निसर्ग शाळा हि समाजासाठी मैलाचा दगड ठरलेला आहे.याशिवाय संस्थेच्या माध्यमातून पार पडलेले १५० जोडप्यांचे सामुदायिक विवाह सोहळे यामध्ये पार पाडण्यात प्रमुख भूमिका आहे.
या संस्थेच्या माध्यमातून खोपोली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात पाच वर्षापासून पुरविण्यात येणारे दोन वेळचे निःशुल्क भोजन व खोपोली परिसरात अंतिम विधीसाठी उपलब्ध असणारी स्वर्ग रथ सेवा चालविण्यात अग्रेसर आहेत.लैंगिक शिक्षणाचे व सायबर क्राईमचे धडे विद्यार्थिनींना देताना समाज जागृती मध्ये अग्रेसर आहेत. याशिवाय सहज सेवेचे अन्य वर्षभर चालणारे उपक्रम समाजाचे ऋण आहेत हे मानून काम करतात.
या सर्व कार्याची नोंद घेवून रायगड पोलिस दलातर्फे नवदुर्गा सन्मान सोहळा २०२३ च्या निमित्ताने महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी
डॉ.योगेश म्हसे, रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष पालकमंत्री उदय सामंत होते.यावेळी जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील महिला व पोलीस महिला यांनाही सन्मानित करण्यात आले.
सदर सन्मानाला उत्तर देताना सहज सेवा फाऊंडेशन च्या उपाध्यक्ष इशिका शेलार यांनी समाजासाठी अजूनही प्रभावी कार्य करण्याची मनीषा व्यक्त केली.
0 Comments