किल्यांची प्रतिकृती निर्माण करून चिमुकल्यांनी दिला किल्ले संवर्धनाचा संदेश

 किल्यांची प्रतिकृती निर्माण करून चिमुकल्यांनी दिला किल्ले संवर्धनाचा संदेश,बीजेपी तालुका उपाध्यक्ष - जयेश पाटील यांनी केले कौतुक 






पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा 
माजगांव : ३ नोव्हेंबर, 

              दिवाळी या सणामध्ये किल्ले बनविण्यांची जणू बच्चे कंपणी ची स्पर्धाच ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे.एकापेक्षा सरस असे किल्ले प्रत्येकांच्या घरी पहावयास मिळत असून जणू ही लहान मुले आपल्या महाराष्ट्रात असलेले किल्ले जतन करण्यांचा संदेश या माध्यमातून देत असल्यामुळे तयार झालेले किल्ले पहाताच क्षणी आपण एखाद्या किल्यांच्या जवळ असल्यांचा भास निर्माण होत आहे.
                  काही मुले किल्ल्यांची हुबेहुब प्रतिकृती बनवित असल्यामुळे हे पाहणे प्रेक्षणीय ठरत आहे.त्याच बरोबर सामाजिक बांधिलकी जोपासली जात आहे.किल्यांवर ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज,मावळे, सैन्य, तोफ, वाघ, हती, हरीण असे विविध प्राणी,किल्यावर ठेवून किल्यांची भुरळ पडली  जात आहे.किल्ला बनविताना विशिष्ट पद्धतीचा वापर करून तयार केला जात आहे.तोफ कुठे ठेवायची भुयारी मार्ग,नगार खाना,दारु गोळा,गुप्त बैठक,पाण्यांचे हौद,तलाव,विहीर,गुरांचा गोठा,मंदिर,मावळ्यांची राहण्यांचा निवारा जणू या ठिकाणी पाहावयास मिळत आहे.
            किल्यांची तटबंदी साठी चुनखडी चा वापर करुन रंगविले जात.असे किल्ले सध्या ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे.शाळेला सुट्टी पडल्यापासुन मनात एकच विचार रेंगाळत असतो की? माझा किल्ला हा प्रत्येकाला पाहात क्षणी आवड निर्माण व्हावी? शिवाय या माध्यमातून किल्ले जोपासण्यांचा आणी त्यांचे संवर्धन व्हावे हा संदेश आताच्या तरुण वर्गामध्ये निर्माण व्हावे.या उद्देशाने किल्ले बनविण्यात येत असल्यांचे सार्थक शरद काठावले,जिवन काठावले,निल राजेश काठावले,वेदु रविंद्र काठावले,यज्ञेश पाटील प्रतिनिधी शी बोलताना व्यक्त केले.                    यावेळी बीजेपी तालुका उपाध्यक्ष - जयेश पाटील,वर्दविनायक ग्रुपचे पदाधिकारी दिलीप काठावले, गजानन काठावले,संदीप काठावले, किशोर काठावले,निखिल काठावले,अदि उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर