पाताळगंगा वृत्तसेवा
खोपोल : ११ जुलै,
खोपोली हद्दीत दिनांक ०७ जुलै २०२३ रोजी बेवारस स्थितीमध्ये वरची खोपोली येथे एक गतिमंद व्यक्ती नागरिकांना आढळून आली. त्यातील काही जागृत नागरिकांनी सदर मुलास पोलीस स्टेशनला आणले होते. सदर मुलास बोलता येत नाही त्याचप्रमाणे लिहिता - वाचता येत नाही. त्याचे नाव -गाव, पत्ता समजून येत नाही. त्याच्या नातेवाईकांचा शोध सुरू असून त्याला मतीमंद मुलांच्या संस्थेत दाखल करण्यासाठी प्रयत्न सुरू होते.
खोपोली पोलीस स्टेशनने ४ दिवस सदर मुलाची ओळख पटविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन पुन्हा या निमीत्ताने समाजास पाहण्यास मिळाले.
खोपोली पोलीस स्टेशनने मतिमंद शोध मोहिमेत सहकार्याची भूमिका बजावण्यासाठी केलेल्या आवाहननुसार सहज सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून पुणे येथील संस्थेत दाखल करण्यासाठी होकार मिळाल्यावर सर्व कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करुन दिनांक १० जुलै २०२३ च्या मध्यरात्री सदर मुलास पुणे येथे त्याच्या घरच्यांची ओळख पटेपर्यंत ठेवण्यात आले आहे.
खोपोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक शितल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक पोलीस निरिक्षक हरेश काळसेकर यांच्या निर्देशनानुसार सहज सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ . शेखर जांभळे तसेच पदाधिकारी यांनी सदर मुलास श्रावस्ती आधार फाउंडेशन,पुणे येथे दाखल केले आहे.
या मदत कार्यात विशेष सहकार्य करणारे उमेद फाउंडेशनचे राकेश सनस, श्रावस्ती आधार फाउंडेशन पुणेच्या अध्यक्षा कांचन कदम व त्यांची टीम,खोपोली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उप निरीक्षक कलिंदर तडवी,पोलीस अमलदार राहुल चौगुले, वसंत जाधव ,बंटी कांबळे,रुद्र गौडा
यांचे विशेष सहकार्य लाभले.सदर व्यक्ती विषयी किंवा त्याच्या नातेवाईकांविषयी कोणाला काही माहिती मिळाल्यास खोपोली पोलीस स्टेशन ( 02192-263333 ) अथवा सहज सेवा फाऊंडेशन ( 9975492470 ) सोबत संपर्क करावा असे आवाहन करण्यात येत आहे.
0 Comments