पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
जांबरुंग : १० जुलै,
दैनंदिन जिवनात भाज्यांचे महत्व खूप असून प्रत्येक जण बाजार पेठेत दाखल होणारी भाजी खरेदी करत असतो.मात्र काही ही भाजी ताजी नसल्यांचे आपणांस निदर्शनास येत असते.मात्र आपण आपल्या आरोग्यासाठी ताजी भाजी निर्माण करु शकतो आपल्या आहारात मिरची, काकडी, वांगी, दुधी, कारले भोपला,भेंडी,गवार,तमाटर आश्या विविध भाज्यांचा समावेश असणे गरजे असून ही भाजी आपण अल्पशा जागेत निर्माण करु शकतो या उद्दात विचारांतून महिला वर्गांस जांबरुंग येथे परसबाग बियाणे वाटप यावेळी शेकडो महिला वर्गांनी लाभ घेतल.
परसबाग बियाने लागवड पासून ते फलधारणा, पासून यांची सखोल माहिती देण्यात आली.शिवाय आपणांस ताजी भाजी उपलब्ध होत असल्यामुळे बाजारपेठेतून भाजी विकत घ्यावी लागणार नाही.यामुळे साहजिकच अर्थिकची बचत होत असते.पावसाचे चार महिने पाऊस असल्यामुळे आपण रोपांना पाणी घालण्यांचे आवश्यकता भासत नाही.मात्र थोडीशी मेहनत घेतल्यास आपल्या कुटुंबासाठी ताजी भाजी उपलब्ध होत असते.
हा कार्यक्रम महाराष्ट्र शासन-कृषी विभाग,तालुका कृषी अधिकारी खालापूर कार्यालया च्या माध्यमातून जांबरुंग येथे करण्यात आले
यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी खोपोली फुलसुंदर तालुका कृषी अधिकारी निंबाळकर,कृषि परिवेक्षक खालापूर नितिन महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली " माझ्या चांगल्या आरोग्यासाठी माझी परसबाग"याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, महाडीबीटी यांत्रिकीकरण योजना, पी.एम.एफ. एम.ई , खरीप हंगाम भात पीक विमा योजना, याविषयी कृषी मंजुषा शिंदे यांनी महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित महिलांना भाजीपाला मिनिकीट बियाणे मोफत वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमास महिला वर्गाचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याचे समजते.
0 Comments