एएके कमानी कंपनीने जपली सामाजिक बांधीलकी - नावंढे ग्रामपंचायतीला दिली रुग्णवाहिका व घंटागाडी ,हनुमत पिंगळे यांच्या मागणीला यश

 


एएके कमानी कंपनीने जपली सामाजिक बांधीलकी - नावंढे ग्रामपंचायतीला दिली रुग्णवाहिका व घंटागाडी ,हनुमत पिंगळे यांच्या मागणीला यश 


समाधान दिसले
खालापुर : १३ जुलै,

                नावंढे ग्रामपंचायत हददीतील सर्व नागरिकांकरिता रुग्ण सेवेसाठी सोयीयुक्त तात्काळ सेवा देणारी रुग्णवाहिका व साफसपाई करिता घंटागाडी मिळावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते हनुमत पिंगळे यांनी खालापूर तालक्यातील होनाड येथील एएके कमानी कंपनी व्यवस्थापनाकडे विशेष प्रयत्न केल्याने हनुमत पिंगळे याच्या प्रयत्नांना यश आल्याने कमानी कंपनीने आपल्या सीआरएस फंडाच्या माध्यमातून रुग्णवाहिका व घंटागाडी नावंढे ग्रामपंचायतीला दिल्याने या रुग्णवाहिका व घंटागाडीचा लोकार्पण सोहळा १३  जुलै रोजी सकाळी १० वाजता नावंढे ग्रामपंचायत कार्यालयासमोर पार पडल्याने हनुमत पिंगळे यांच्या पाठपुराव्याच्या कामगिरीचे कौतूक होत आहेत तर कमानी कंपनीच्या सामाजिक बांधीलकी आभार ग्रामपंचायत हददीतील सर्व नागरिक मानत आहेत.                  यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा कामगार नेते हनुमत पिंगळे यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की, कमानी कंपनीने मी केलेली मागणी मान्य करीत सामाजिक बांधीलकी जपण्याच्या हेतुने नावंढे ग्रामपंचायत करीता कंपनीच्या सीआरएस फंडाच्या माध्यमातून रुग्णवाहिका आणि घंटागाडी दिल्याने कंपनी प्रशासनाचे आभार मानून रुग्णवाहिका आणि घंटागाडीचे नावंढे ग्रामपंचायत हददीतील सर्व नागरिक योग्य पद्धतीने वापर करतील असे मत हनुमत पिंगळे यांनी व्यक्त केले.
             याप्रसंगी मोरडे फूड कंपनीचे हर्षल मोरडे, चंद्रकांत मोरडे, महेश मोरडे, कमानी कंपनीचे धीरज तरलेजा, राहुल गुप्ते, सौम्या मौडल, गणेश डोईफोडे, सामाजिक कार्यकर्ते तथा कामगार नेते हनुमत पिंगळे, पं.स.सदस्य अक्षय पिंगळे, सरपंच उषा पिंगळे, उपसरपंच अर्चना पिंगळे,सदस्य श्रीकांत हाडप, संकेत हाडप, प्रकाश पिंगळे, शारदा वाघमारे, शकुन वाघमारे, कांचन हडप, आशा पवार, योगिता कदम, ललिता पिंगळे, अपर्णा पिंगळे, ग्रामसेवक संतोष पवार, कर्मचारी शेखर हाडप, सामाजिक कार्यकर्ते बाळाराम हाडप, तानाजी हाडप, मनोहर हाडप, चंद्रकात हाडप, किरण हाडप, चंद्रकात पिंगळे, तेजस पिंगळे, राकेश फराड, गणेश हाडप, बाबू हाडप, सागर पिंगळे, सत्यम तवले, सूरज दुधावडे, महेश हाडप, गोपीनाथ सोनावणे, अजय पिंगळे, ज्योती पिंगळे आदी प्रमुखासह कमानी कंपनीचे कर्मचारी व ग्रामस्थ वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते 
          खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील नावंढे ग्रामपंचायतीची काही महिन्यांपूर्वी हिंदुस्तान पेट्रोलियम कापोरेशन कंपनीने सीआरएस फंडाच्या माध्यमातून १  रुग्णवाहिका देत सामाजिक बांधीलकी असता या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून नागरिकांनी आधार मिळाल्याने नागरिक समाधान व्यक्त करीत असताना नावंढे ग्रामपंचायत मधील वाढती लोकसंख्या पाहता अजून १  रुग्णवाहिकेची भर पडावी, त्याचबरोबर घंटागाडी मिळावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कामगार नेते हनुमत पिंगळे यांनी होनाड येथील कमानी कंपनी व्यवस्थापनाकडे मागणी केली असता हनुमत पिंगळे यांच्या मागणीला यश आल्याने कमानी कंपनीने आपल्या सीआरएस फंडाच्या माध्यमातून रुग्णवाहिका व घंटागाडी नावंढे ग्रामपंचायतीला दिल्याने या रुग्णवाहिका व घंटागाडीचा लोकार्पण सोहळा 13 जुलै रोजी सकाळी 10 वाजता नावंढे ग्रामपंचायत कार्यालयासमोर पार पडल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करीत कमानी कंपनीच्या सामाजिक बांधीलकी आभार मानले आहेत.


चौकट -
     कमानी कंपनीने दिलेली सर्व सोयीयुक्त रुग्णवाहिका व घंटागाडी नावंढे ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना उपयुक्त ठरणार आहे, त्यामुळे येथील सर्व नागरिक रुग्णवाहिका व घंटागाडीचा योग्य वापर करून या दोन्ही गाड्याची निगा राखणे गरजेचे आहे.
धीरज तरलेजा
कमानी कंपनी व्यवस्थापक 


चौकट -
       सामाजिक कार्यकर्ते तथा कामगार नेते हनुमत पिंगळे यांच्या पाठपुराव्यामुळे नावंढे ग्रामपंचायत करीता रुग्णवाहिका व घंटागाडी कमानी कंपनी व्यवस्थापनाने दिल्याने पुढील काळात रुग्णवाहिका व घंटागाडीचा येथील नागरीक योग्य वापर करतील तसेच हनुमत पिंगळे यांच्या पाठपुराव्याच्या कामगिरीचे कौतूक करून कमानी कंपनीच्या सामाजिक बांधीलकी आभार मानतो.
प्रकाश पिंगळे (नावंढे सदस्य)

Post a Comment

0 Comments

मराठा,कोळी,आगरी,अदिवासी यांची भर सभेत इज्जत काढत असलेला आमदार यांची जागा दाखवून द्या : प्रितम जे. एम.म्हात्रे