पालकांसाठी वेटींग रूम उपलब्ध करून देण्याची सहज सेवा फाउंडेशनची मागणी,खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची लवकरच करणार अंमलबजावणी

 


पालकांसाठी वेटींग रूम उपलब्ध करून देण्याची सहज सेवा फाउंडेशनची मागणी,खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची लवकरच करणार अंमलबजावणी


दत्तात्रय शेडगे 
खोपोली : १३ जुलै,
     
           खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, खोपोलीच्या माध्यमातून खोपोली येथे कार्यरत असणाऱ्या शाळेत खेडेगावातून विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.आडोशी,वावोशी, देवन्हावे,पळसधरी,चौक येथील आसपासच्या खेडेगावातील बरेच पालक विद्यार्थ्यांना सकाळ व दुपारच्या सत्रात शाळेत सोडल्यानंतर पाल्यांना परत घरी नेण्यासाठी काही तास खोपोली परिसरातच थांबतात.विशेष करून महिला पालकांना डब्बा खाणे, शौचालयास जाणे व काही महिलांना त्यांच्यासोबत असणाऱ्या लहान बाळांना स्तनपान करणे ही सुविधा मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणात त्यांची कुचुंबना होत आहे.
                 ऊन व पावसापासून देखील त्यांना त्रासाचा सामना करावा लागतो. ही कुचंबना लक्षात घेऊन सदर पालकांसाठी वेटिंग रूमची सोय करावी.जेणेकरून त्रस्त पालक वर्गाला दिलासा मिळेल यासाठी सहज सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून पालकांसाठी वेटींग रुम सुरू करण्यासंबंधी सहज सेवा फाउंडेशनच्या वतीने अध्यक्ष डॉ.शेखर जांभळे यांच्या वतीने पत्र देण्यात आले.याचसोबत पालक वेटिंग करत असलेल्या काळात सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्याची तयारी देखील सहज सेवा फाउंडेशनने  दाखविली आहे.
            सदर मागणी ही नक्कीच सामाजिक बांधिलकी जपणारे आहे. लवकरच या मागणीचा योग्य तो विचार करून अंमलबजावणी करण्याचे आश्वासन खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, खोपोलीचे चेअरमन संतोष जंगम व सचिव किशोर पाटील यांनी दिले आहे.

Post a Comment

0 Comments

मराठा,कोळी,आगरी,अदिवासी यांची भर सभेत इज्जत काढत असलेला आमदार यांची जागा दाखवून द्या : प्रितम जे. एम.म्हात्रे