संजय कदम पनवेल : ६ जुलै,
टोमॅटोचा राज्यभर तुटवडा निर्माण झाला आहे. यंदा पावसाचे उशीराने झालेले आगमन व त्यात पावसानं दडी मारल्याने टोमॅटोची राज्यभर दरवाढ झालेली आहे. १ किलो टॉमेटोसाठी १०० - १२० रूपये नागरिकांना मोजावे लागत आहे. एकंदरीत टॉमेटोच्या या दरवाढीमुळे सर्वच ठिकाणच्या नागरिकांना टोमॅटो खरेदासाठी अधिकचे पैसे खर्च करावे लागत असल्याने ऐन महागाईच्या काळात त्यांच्या खिश्याला कात्री बसत आहे. त्यामुळे दररोजच्या जेवणामध्ये वापरला जाणारा टोमॅटो चांगलाच महाग झाला आहे. अवकाळी पाऊस आणि सततचा होणाऱ्या पावसामुळे टोमॅटोच्या मालाला जोरदार फटका बसला असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगितले जाते. सध्या बाजारात टोमॅटोच्या गाड्यांची आवक ही कमी होत आहे. त्यामुळे बाजारात टोमॅटोचे १०० ते १२० रुपये दर झाले आहेत, तर किरकोळ दुकानात ह्यापेक्षाही जास्तीच्या दरात टोमॅटो मिळत आहे. टोमॅटोचे दर वाढल्याने नागरिकांचे विशेष करून गृहिणीचे आर्थिक गणितही बिघडले आहे. त्यामुळे खरेदीसाठी आलेले नागरिक टोमॅटोचे दर वाढल्याने नागरिकांचे आर्थिक गणितही बिघडले आहे.
0 Comments