सहज सेवा फाउंडेशनच्यावतीने आनंद शाळा येथे लैंगिक शिक्षण मार्गदर्शन, २०२३ - २४ या शैक्षणिक वर्षात खालापूर तालुक्यातील शाळेत करणार सहज सेवा फाऊंडेशन प्रबोधन

 


सहज सेवा फाउंडेशनच्यावतीने आनंद शाळा येथे लैंगिक शिक्षण मार्गदर्शन,

२०२३ - २४  या शैक्षणिक वर्षात खालापूर तालुक्यातील शाळेत करणार सहज सेवा फाऊंडेशन प्रबोधन

दत्तात्रय शेडगे 
खोपोली : १५ जुलै, 

             शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विद्यार्थ्याच्या मनातील लैंगिक प्रश्नांना व शंकांना व्यक्त होण्यासाठी व माहिती जाणून घेण्यासाठी सहज सेवा फाउंडेशनच्या वतीने  एक हक्काचं सहज व्यासपीठ शाळा व कॉलेज मधील विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ आनंद शाळा,शीळफाटा येथुन दिनांक  १५जुलै  रोजी करण्यात आला असुन,आनंद शाळा, शिळफाटा येथील विदयार्थ्यांना  खोपोली येथील प्रख्यात डॉ.संगीता  केजरीवाल व डॉ.आयेशा सोरठीया यांनी काहीं निवडक व्हिडिओच्या माध्यमातुन प्रभावी भाषेत मार्गदर्शन केले.
याचसोबत आनंद शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा त्रिपाठी यांनी विद्यार्थ्यांसाठी लैंगीक शिक्षणं ही काळाची गरज असल्याचे सांगितले.
           

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी आनंद शाळेच्या संचालिका आसावरी दंडवते, मुख्याध्यापीका सीमा त्रिपाठी, मधुरा दबके  व शालेय स्टाफ तसेच सहजसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.शेखर जांभळे, कार्याध्यक्षा माधुरी गुजराथी,उपाध्यक्षा इशिका शेलार,सचिव अखिलेश पाटील,खजिनदार संतोष गायकर,जनसंपर्क प्रमुख जयश्री कुलकर्णी,महीला संघटक निलम पाटील यांनी अथक परिश्रम घेतले. या सातत्यपूर्ण सुरू असणाऱ्या उपक्रमासाठी खालापुर तालुक्याचे तहसीलदार आयुब तांबोळी यांचे बहुमोल सहकार्य व मार्गदर्शन लाभले आहे.
                    दरवर्षी खालापूर तालुक्यातील शाळेत सहज सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थी साठी लैंगिक शिक्षण तसेच सायबर क्राईम याविषयी प्रबोधन केले जाते. यावर्षी २०२३ - २४  सुद्धा विद्यार्थी व पालकांसाठी सदर उपक्रमाचे आयोजन केले जाईल असे सहज सेवा फाउंडेशनचे खालापूर तालुका प्रमुख मोहन केदार यांनी विषद केले आहे

Post a Comment

0 Comments

मराठा,कोळी,आगरी,अदिवासी यांची भर सभेत इज्जत काढत असलेला आमदार यांची जागा दाखवून द्या : प्रितम जे. एम.म्हात्रे