खांदा कॉलनीतील बेलेझा सभागृहात दिशाचा 'श्रावणरंग' सोहळाचे आयोजन

 


खांदा कॉलनीतील बेलेझा सभागृहात दिशाचा 'श्रावणरंग' सोहळाचे आयोजन

संजय कदम                                                              पनवेल दि.१४ जुलै ,

             नोकरदार व गृहिणी असलेल्या महिलांना त्यांचा कलागुणांना वाव देण्यासाठी दिशा महिला मंचच्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्याचाच एक भाग म्हणून 29 जुलै 2023 रोजी दुपारी 1 वाजता खांदा वसाहतीतील बेलेझा हॉलमध्ये 'श्रावणरंग' 2023 सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने सहभागी झालेल्या महिला कलाविष्काराचे सादरीकरण करणार आहेत. या निमित्ताने श्रावण साम्राज्ञी या स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन व्यासपीठाच्या संस्थापिका निलम आंधळे यांनी केले आह                                                रोजच्या धावपळीत, त्याचबरोबर नोकरी आणि कौटुंबिक जबाबदारीतून स्वतःच्या आवडीनिवडी त्याचबरोबर अंगी असलेल्या कलांना महिला भगिनींना वाव देता येत नाही. त्यांना  संधी उपलब्ध होत नसल्याने सुप्त 'कला' तशाच दडून राहतात. अशा महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम दिशा महिला मंच करीत आहे. 'ति'चे अस्तित्व आणि हक्कासाठी संस्था अतिशय तळमळीने काम करीत आहे. महिला सबलीकरण व सक्षमीकरणाबरोबरच त्यांच्यातील कलेला सुद्धा दाद दिशाने दिलेली आहे. याच उद्देशाने दरवर्षीप्रमाणे यंदाही 'श्रावणरंग' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नव्या युगासवे चालू या जुन्या परंपरा झोपूया संगम दोघांचा घडवूया मंगळागौरीचा जागर करूया हे ब्रीदवाक्य घेऊन हा सोहळा आयोजिला आहे. स्पर्धा आणि विविध प्रकारचे खेळ या व्यासपीठावर खेळले जाणार आहेत. अधिक माहितीसाठी 9702486286, 9773514151 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments

मराठा,कोळी,आगरी,अदिवासी यांची भर सभेत इज्जत काढत असलेला आमदार यांची जागा दाखवून द्या : प्रितम जे. एम.म्हात्रे