रसायनी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असताना कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यांच्या स्मृती दिनानिमित्ताने दिलासा फाऊंडेशन तर्फे दरवर्षी विविध उपक्रम राबवले जातात. यंदा दुचाकी चालकाना हेल्मेट आणि खालापूर नगरपंचायत सफाई कर्मचारी यांना छत्रीचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजन खालापूर पोलीस ठाणे येथे करण्यात आले होते.हेल्मेट वापराबाबत जागरुकता वाढावी हेल्मेट सक्ती नाही तर शक्ती या उद्दिष्ट ठेवून उपक्रम सुरू करण्यात आला आहे. खालापूर पोलीस ठाणे सहकार्याने आयोजित करण्यात आले. कार्यक्रमासाठी खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी, खालापूर पोलीस निरीक्षक बाळा कुंभार, खालापूर नगरपंचायत नगराध्यक्षा रोशना मोडवे, महिला पोलीस उपनिरीक्षक सरला काळे, सपोनि गणेश कराड, माजी उपनगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक राजेश पारठे,नगरसेवक, आकेश जोशी, दिनेश फराट,महेश पवार, नगरसेविका उज्वला निधी, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र शहा,पंचायत समिती खालापूर माजी उपसभापती, श्याम, साळवी,जेष्ठ पत्रकार अमोल राजे बांदल पाटील,अरुण नलावडे, दिलीप पवार, ,हनुमंत मोरे, अर्जुन कदम, दिपक जगताप, प्रसाद अटक, विकी भालेराव,डाॅ शेखर जांभळे,पोलीस पाटील संघटना खालापूर तालुका अनंता ठोंबरे
इनरव्हिल क्लबच्या माजी अध्यक्षा क्षमा आठवले, सामाजिक कार्यकर्ते वैभव भोईर, पवन दिवेकर,उमेश पडवकर,निवृत्त पोलीस अधिकारी सुरेंद्र कुलकर्णी, राजेश भालेराव, संजय कचरे, चौक ग्रामपंचायत सदस्य निखिल मालुसरे, राहुल देसाई, मिलिंद पाटील, राजा पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. महेश कळमकर रस्ता अपघातात दुचाकी चालकाना हेल्मेट जीव वाचवण्यासाठी संजीवनी असल्याचे तहसीलदार आयुब तांबोळी यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांनी देखील हेल्मेट सक्ती नाही तर शक्ती असल्याचे सांगत या उपक्रमासाठी पोलीस विभाग सदैव दिलासा फाऊंडेशन सोबत सहकार्य असणार असे सांगत उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उमेश विचारे यांनी तर आभार हनुमंत मोरे यांनी मानले.
चौकट
-कोरोना पासून संरक्षण करण्यासाठी ज्याप्रमाणे लस तसेच दुचाकी चालवताना संरक्षण म्हणून हेल्मेट वापरणे आवश्यक आहे. हेल्मेट असल्याने अनेक जीव वाचले आहेत. हेल्मेट ओझ वाटू नये म्हणून हेल्मेट सक्ती नाही तर शक्ती अभियान अंतर्गत वर्षभरात पाचशे कुटुंबापर्यंत हेल्मेट वाटप करण्यात येईल. (मनोज कळमकर-दिलासा फाऊंडेशन)
0 Comments