लव्हेज ग्रामस्थ,वनविभाग कर्मचारी यांच्या माध्यमातून वृक्ष लागवड

 


पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
लव्हेज : ४ जुलै, 
                 वृक्ष लागवड आणी संवर्धन ही काळाची गरज आहे. आगामी काळातील धोके जाणून घेवून तरुण वर्ग वृक्ष लागवड कडे वळले आहे.वृक्षापासून सावली तर मिळतेच शिवाय शुद्ध हवा सुद्धा आपणांस मिळत असते.वनविभाग यांच्या सयुक्त विद्यामाने "वनसंवर्धन" आठवडा म्हणून वृक्षारोपण करण्यात आले.शेकडो वृक्ष लागवड करण्यात आली.पिंपळ ,निलगिरी कडूनिंब,करंज,अर्जुन,रीठा,सफकर्णी,कुंतजिवा,निंबारा,रेनट्री,वड,गुलमोहर ,सुबाबुल,बेहडा,आश्या विविध वृक्षांची लागवड लव्हेज या ठिकाणी करण्यात आली.
                 पुर्वी अनेक प्रकारची झाडे या मध्ये वनऔषधी सुद्धा होती.संपूर्ण ठिकाणी वृक्षच होती.मात्र विविध कारणास्तव वृक्षांची तोड मोठ्याप्रमाणावर झाल्यामुळे निसर्गाचा समतोल ढासळत चालला आहे.मात्र निसर्गाचे बदललेले चित्र थांबविण्यांची ताकद वृक्षामध्ये असून वृक्ष लागवड आणी त्यांचे संवर्धन हा कार्यक्रम हाती घेण्यात आले.कोरोनांच्या काळात ऑक्सिजनची किती मोल आहे.यांचे समिकरण ओळखून आज विविध कार्यक्रमात वृक्ष लागवड चा कार्यक्रम हाती घेण्यात आला.  वृक्ष लागवड करा,त्यांचे संवर्धन करा,पर्यावरणांचा समतोल अबाधित ठेवण्यासाठी वृक्ष लागवड करणे अतिषय महत्वाचे आहे.
            यावेळी  वनपाल खोपोली - भगवान दळवी,
      वनरक्षक लव्हेज  -संतोषी बास्टेवाड, वनरक्षक - कांचन गायकवाड,वनरक्षक - नितीन कराडे,या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक सदाशिव पाटील,तसेच या वृक्ष लागवड साठी करण्यात सोपान पाटील , अरुण पाटील , जयेश मोरे, समीर शिंदे , शैलेश थरकूडे, राजेश पाटील, सिद्धेश पाटील, विजय पवार,अभिषेक पाटील, अनिकेत पाटील, अभिनव पाटील, संकेत पाटील,अदि ने वृक्ष लागवड करण्यांस पुढाकार घेतला.




Post a Comment

0 Comments

अवघा रंग एक झाला,तळवली वारकरी यांच्याकडून पायी दिंडीचे आयोजन