रायगडमध्ये 'कर्जत मधील सोनल पाडा धरणाला लागली गलती कधीही फुटण्याची शक्यता; ग्रामस्थांना मधे भितीचे वातावरण
नवज्योत पिंगळे
कर्जत रायगड : २२ जुलै,
रायगड जिल्हा परिषदेने १९८० मध्ये कर्जत जामरूख भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभाग यांच्या माध्यमातून सोलन पाडा येथे धरण बांधले.मात्र गेले काही दिवस या धरणाच्या बांधातून गळती सुरू आहे. धरणाच्या बांधामधून पाण्याची गळती सुरूच असल्यामुळे हे धरण फुटण्याची भीती स्थानिकांमधून व्यक्त केली जातेय.
त्यातच आठवड्या भरापासून राज्यात पावसाची संततधार सुरू आहे. मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. रायगडमध्ये इर्शाळवाडीत भूस्खलनामुळे २५ हून अधिक घरं जमिनीखाली गाडली गेली. या दुर्घटनेनंतर आणखी काही ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटनाही घडल्या आहेत. संकटांची मालिका सुरूच असताना आता आणखी एक धोका निर्माण झाला आहे.
सोलनपाडा धरणाच्या बांधातून सुरू असलेली गळती रोखण्यासाठी या आधी दुरुस्तीचं कामही करण्यात आलं होतं. मात्र हे काम केल्यानंतरही गळती सुरूच आहे. त्यामुळे आता हे धरण फुटण्याची भीती स्थानिकांमध्ये आहे. या धोक्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. पावसाळा आला आणि पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरला की, पाण्याच्या गळतीमुळे धरण कधीही फुट्न दुर्घटना होऊ शकते. या भीतीने आता ग्रामस्थांची झोप उडाली आहे. पाटबंधारे उच्चस्तर विभागाला कळवले असून गळती रोखण्याचे काम सुरु आहे.
0 Comments