उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ,मोफत आरोग्य तपासणी शिबिर


 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ,मोफत आरोग्य तपासणी शिबिर


दीपक जगताप 
खालापूर : २२ जुलै,

                महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत श्री छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय शेडुंग व भारतीय जनता पार्टी वडवल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी प्राथमिक शाळेत करण्यात आली.यावेळी  डॉक्टरांचा स्टाफ या ठिकाणी उपस्थित राहून सकाळ पासून आरोग्य तपासणींस सुरुवात झाली.यावेळी  शेकडो ग्रामस्थांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली.

         आज वाढत जाणारी महाघाई यामुळे आपण आपल्या आजारांकडे सातत्याने दुर्लक्ष करीत असतो.मात्र काही वेळा हेच छोटे आजार आपल्या जिवावर बेतू शकते.मात्र प्रत्येकांची घरची स्थिती उत्तमच आहे असे नाही.मात्र भारतीय जनता पार्टी वडवळ जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल मोरे यांच्या संकल्पनेतून या आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले.यावेळी सर्दी ,ताप ,खोकळा,डेंग्यू,बीपी ,शुगर,टाचांचे आजार,गुढगे दुःखी,कंबर दुःखी,ऑक्सिजन लेव्हल,त्वचा रोग,मासिक पाळी उपचार,वजन उंची अदि तपासणी करण्यात आली.तसेच औषध ही देण्यात आली.

                यावेळी भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल मोरे,ग्रामपंचायत सदस्या-यशोदा मोरे,मानसी सकपाळ,अंकिता सकपाळ,भाग्यश्री सावंत,सदस्य - जगदीश मरागजे,संजय कदम,अक्षय सकपाळ,रवींद्र मरागजे,सचिन मोरे,विकी मोरे,सागर मोरे,रवींद्र मरागजे,डी डी मरागजे,संदेश चाळके,तसेच डॉ. प्रद्युमन भोसले,प्राची भोईर,संगीता जाधव,सदानंद शेडगे ,मनोज बिरवाडकर  ,उर्मिला चव्हाण ह्यांच्या सह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

              


           

Post a Comment

0 Comments

टी.एन.एम.पब्लिक स्कूल असरोटी,विद्यालयाचे काम कौतुकास्पद नंदकुमार वाळंज