विद्यार्थ्यांच्या ई लर्निंग सॉफ्टवेअर,तरुण वर्गांसाठी व्यवसायिक सल्ला,महेश निमणे यांचा स्तुत्य उपक्रम
पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
खोपोली : २२ जुलै,
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावे,त्यांच्या शिक्षणांचे ओझे कमी व्हावे यासाठी ते सातत्याने तालुक्यास जिल्ह्यातील माध्यमिक शाळा,महाविद्यालय भेट देत असतात.त्यांनी खूप शिकावे, या उद्दात विचारांतून, अनेक शाळेमध्ये ई लर्निंग सॉफ्टवेअर उपलब्ध करुन दिले.आठवी ते दहावी विद्यार्थ्यांना त्यांचा आभ्यास सोपे जावे त्यांचे स्वप्न हे सत्यात उतरावे यासाठी ते सातत्याने मेहनत घेत आहे.त्याच शिक्षण पुर्ण झाल्यावर नोकरी सांभाळून आपल्याला व्यवसाय कसा करता येइल यासाठी एकशे एक पुस्तक लिहले यामुळे साहजिकच अनेक तरुण वर्गांस त्यांचा नक्की उपयोग झाला.
त्याच बरोबर सामाजिक उपक्रम राबवून, १९ वर्षामध्ये ३१ रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.कारण सर्वात मोठे दान म्हणून रक्त दान याकडे पाहिले जाते.रक्त आपण निर्माण करु शकत नाही.मात्र ते दान करुन एखाद्याचे प्राण वाचू शकतो. असे मार्गदर्शन करुन तरुण वर्गामध्ये सकारात्मक बदल घडवून आनले आहे. त्याच बरोबर वास्तुशास्त्र च्या माध्यमातून अनेक घर,ऑफीस,दुकाने यांना वास्तु सौख्य अगदी कमी खर्चात मिळवून देण्याचे काम व मोफत मार्गदर्शन करुन देवून त्यांचे जिवन सुखमय बनविले.
कोणताही व्यवसाय करण्यासाठी मार्गदर्शन,बचत गटाला ,गरजू महिलावर्ग आणि छोटे व्यापारी यांना सवलतीच्या दरात कर्ज उपलब्ध करून देण्यात ते सातत्याने अग्रेसर असतात.कारण गेली अनेक वर्ष बँकिंग आणि इन्शुरन्स क्षेत्रात काम करत असल्याने मोफत सल्ले देण्याचे काम करीत आहे.त्याच बरोबर करमणूकीसाठी सांस्कृतिक कार्यक्रम विरेश्वर मंदिर येथील तबला वादक व कला क्षेत्रातील कविता सादरीकरण असे विविध कार्यक्रम हाती घेतले गेले.नुकताच त्यांची काही तरी उद्योग करा रे !हि कविता सादर करून अनेकांची मने जिंकली.
वाचन केल्यांस आपणांस त्याचा खूप लाभ होत असतो.मात्र टीव्हीवरील जाहिरातील सिनेमा,मनोरंजन यांच्यात गुरफटून न जात आपण आपले लक्ष आभ्यसात एक लक्ष केल्यांने आपणांस निच्छितचं यश मिळू शकतो.असे मार्गदर्शन करीत असतात.
0 Comments