जितेश सुतार यांची आम आदमी पार्टी शहर संघटक पदी नियुक्ती
आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने आप तर्फे मोर्चेबांधणी सुरू
माय मराठी न्युज : वृत्तसेवा खोपोली : ६ ऑक्टोबर
स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या अनुषंगाने आम आदमी पार्टी खोपोली शहरात जोरदार काम करीत असून नागरिकांच्या मनात आपले स्थान बनवत आहे. खोपोली शहरात संघटन मजबूत करण्याकरिता आम आदमी पार्टीने समता नगर येथे राहणारे पक्षाचे सदस्य जितेश सुतार यांना मोठी जबाबदारी देत शहर संघटक पदी नियुक्त केले आहे. जितेश सुतार यांचा दांडगा जनसंपर्क नक्कीच पक्षाला नवी उभारी देईल अशी आशा व्यक्त करत आम आदमी पार्टी प्रदेश संघटन सचिव डॉक्टर पठाण, खालापूर तालुका उपाध्यक्ष कस्तुरचंद राठोड, खोपोली शहर अध्यक्ष ग्यासुद्दीन खान, खोपोली शहर उपाध्यक्ष विवेक वाघमारे यांच्या हस्ते सदर नियुक्ती पत्र देण्यात आले. आम आदमी पार्टी खोपोली नगर परिषदेच्या सर्व जागेवर आपले उमेदवार उभे करणार असून आम्ही नगराध्यक्ष पदासाठी सुद्धा मजबूत उमेदवार देणार आहोत असे आम आदमी पार्टी खोपोली शहर अध्यक्ष ग्यासुद्दीन खान यांनी यावेळी सांगितले. शहरात चालत आलेले प्रस्थापित राजकारण बदलण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. सत्तेसाठी नाही तर व्यवस्था परिवर्तनासाठी निवडणूक लढणार आहोत. खोपोली शहराला देशातील नंबर एक शहर बनवणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. नागरिकांनी आम्हाला ह्या परिवर्तनाच्या लढ्यात सहकार्य करावे असे आवाहन आम आदमी पार्टी प्रदेश संघटन सचिव डॉ पठाण यांनी केले आहे.

0 Comments