उपसरपंच पदि वंदना सुधाकर महाब्दी बहुसंख्येने विजयी

 ग्रुप ग्राम पंचायत माजगांव चा कारभार महिलाच्या हाती, उपसरपंच पदि वंदना सुधाकर महाब्दी बहुसंख्येने विजयी 



माय मराठी न्युज : वृत्तसेवा 
माजगाव   : २८  ऑक्टोबर,

               ग्रूप ग्राम पंचायत माजगांव उपसरपंच पदासाठी वंदना सुधाकर महाब्दी  व शशिकांत पाटील यांनी सकाळी अर्ज दाखल करण्यांत आले.यावेळी ग्राम पंचायतीची विशेष सभा आयोजित करण्यात आली मात्र या पदासाठी मतदान करण्यांत आले.वंदना महाब्दी यांस ७ मते पडून त्या विजयी झाले.शशिकांत पाटील यांस ३ मते पडली.यामुळे त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यांत आले.महाब्दि यांची उप सरपंच पदि निवड करण्यांत झाल्यांने तीचे सर्व स्थरातून कार्यकर्ते यांनी अभिनंदन करण्यांत आले.या अगोदर उप सरपंच पदाचा कार्यभाग अपर्णा शिंदे हे सांभाळीत होते.मात्र आपला कार्यकाळ पूर्ण होताच उप सरपंच पदाचा राजीनामा देण्यात आला.
         

  ग्रूप ग्राम पंचायत माजगांव सरपंच पद हे महिला पाहत असतांना आता उप सरपंच सुद्धा महिला असल्यामुळे गावातील विकासांची दोरी महिलांच्या हाती असल्यांचे बोलले जात आहे.यावेळी सर्वांच्या मते उप सरपंच पदि वंदना महाब्दी यांची निवड झाल्यांचे ग्रामसेवक संदीप धारणे,सरपंच दिपाली नरेश पाटील,सदस्य - ,सरिता वाघे,वैशाली महाब्दी,राजेश पाटीलप्रांजळ जाधव,अपर्णा शिंदे अदि च्या उपस्थित राहून पदभार स्विकारला.
         वंदना महाब्दी यांची  उप सरपंच पदाची निवड होताच फटाक्याच्या अतिषबाजीत चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती खालापूर- जयवंत पाटील, विलास कांबळे,सुर्यकांत कांबळे,नरेश पाटील,महेश महाब्दी,सुरेश महाब्दी,नितिन महाब्दी,सागर महाब्दी,दिपक जाधव,संदिप जाधव,मंगेश पाटील,मोतिराम वाघे,बाबु वाघे,मारुती ढवाळकर,यशवंत शिंदे,जयेश पाटील,अमित पाटील अदि उपस्थित होते.





Post a Comment

0 Comments

टी.एन.एम.पब्लिक स्कूल असरोटी,विद्यालयाचे काम कौतुकास्पद नंदकुमार वाळंज