पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
चावणे : ९ जुलै,
रसायनी पाताळगंगा हा औद्योगिकरण झपाट्याने वाढत असल्यामुळे कामगारांच्या समस्या गंभीर बनत आहे.समान वेतन समान काम हे धोरण व्यवस्थापक स्विकारत नसल्यामुळे येथिल स्थानिक भूमिपुत्र अथवा या परिसरातील तरुण वर्ग युनियन चे नेतृत्व स्विकारत आहे. कासप - चावणे या परिसरात असलेली पेट्रोनस लूब्रिकेंट इंडिया प्राइवेट लिमटेड कामगारांनी भारतीय कामगार कर्मचारी महासंघ युनियनचे नेतृत्व स्विकारुन व्यवस्थापकांच्या या मनमालीला चांगलाच चाप दिला आहे.
पाताळगंगा या परिसरात विविध काराखाने असून, आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी विविध युनियन जाले पसरले आहे.मात्र तरुणाई आदर्श असलेले भारतीय कामगार कर्मचारी महासंघ युनियनचे सरचिटणीस आ. भाई जगताप, अध्यक्ष - दिलीपदादा जगताप,उपाध्यक्ष - सदाभाई चव्हाण,यांच्या युनियन नेतृत्व स्विकारून नाम फलकांचे अनावरण उपाध्यक्ष सदाभाई चव्हाण त्यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी यांचे आगमन होताच कामगारांनी गेटबाहेर आतषबाजी करुन त्यांचे स्वागत करण्यात आले.
व्यवस्थापक कामगारांना कायदे प्रमाने कूठल्याही प्रकारची सूविधा न देता त्या कामगारांची पिळवणूक करीत असल्यामुळे त्यातच वाढत जाणारी महाघाई मुळे सर्व सामान्य कामगारांची अवस्था बिकट होत चालली असतांना त्यातच अर्थिक तूट्पुंजी प्रमाणात मिळत असून घरचे भागविने मोठ्या कष्टाचे होत असल्यामुळे येथिल कामगारांनी भारतीय कामगार कर्मचारी महासंघांचे नेतृत्व स्विकारले असल्यांचे कामगार प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.
पेट्रोनस कंपनीतील कामगारांवर कोणताही अन्याय होवू देणार नाही. त्यांच्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून.स्थानिक कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठीच युनियनची स्थापणा केल्याचे सदाभाई चव्हाण यावेळी बोलतांना म्हणाले.या कामगारांना न्याय देण्यासाठी ही युनियन सातत्याने कामगारांच्या पाठी असून कामगारांच्या हितासाठी सदैव तत्पर असल्यांचे चर्चा कामगारांत सुरु होती. यावेळी परिसरातील मान्यवर ,कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी युनियन प्रतिनिधी म्हणून अध्यक्ष विशाल मुंढे,उपाध्यक्ष समिर ठोंबरे,खजिनदार मनोज लभडे,सेक्रेटरी - अतुल बोटे तसेच हरिभाऊ मालकर,धनाजी गावडे,नितिन काठावले,कालीदास ठोंबरे अदि उपस्थित होते.
0 Comments