भारतीय जनता पार्टी खोपोली शहर तर्फे हिंदी विद्यालय मधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

 


दीपक जगताप                                                              खालापूर : १० जुलै,

               भारतीय जनता पार्टी  खोपोली शहर तर्फे शक्ती केंद्रप्रमुख संजय म्हात्रे यांच्या संकल्पनेतून, उत्तर रायगड जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा अश्विनी ताई पाटील यांच्या सहकार्यातून १०जुलै रोजी हिंदी विद्यालय मोगलवाडी खोपोली येथे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. 
                 खोपोली शहर अध्यक्ष रेटरेकर, युवा नेते राहुल जाधव, चिटणीस गोपाळ बावस्कर, वैद्यकिय सेलचे सह संयोजक विकास खुरपडे, महिला मोर्चा सरचिटणीस अश्विनी अत्रे, उपाध्यक्षा अपर्णा साठे, अस्मी सावरेकर, सुप्रिया नांदे, बुथ अध्यक्ष जयवंत वाघ यांचा हस्ते गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.  
             या कार्यक्रमा निमित्त उत्तर रायगड जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा अश्विनी ताई पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, शाळेचे मुख्याध्यापक सिंग सर, रेश्मा बांदल, मनीषा देशपांडे शाळेतील शिक्षक, कर्मचारी, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन भाईदास पाटील सर यांनी केले. 

Post a Comment

0 Comments

मराठा,कोळी,आगरी,अदिवासी यांची भर सभेत इज्जत काढत असलेला आमदार यांची जागा दाखवून द्या : प्रितम जे. एम.म्हात्रे