कडाक्याची गाणी आदीवासीवाडीला दरडचा धोका, प्रशासना कडून स्थलांतरांची नोटीस,ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी राहण्यांची व्यवस्था
कृष्णा भोसले
तळा सोनसडे : २१ जुलै
तालुक्यातील कडाक्याची गाणी ही आदिवासीवाडी डोंगर भागात असल्याने या ठिकाणी अतिवृष्टीमुळे दरड कोसळून या वाडीला धोका निर्माण होवू शकतो. यामुळे प्रशासकीय अधिकारी यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून सुरक्षित ठिकाण म्हणून पिटसई कोंड येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये रहाण्याची व्यवस्था करण्यात आली. कारण खालापूर तालुक्यातील ईर्शाळवाडी येथे दरड कोसळ्यांने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. मात्र ती परस्थिती निर्माण होवू नये यासाठी ही खबरदारी ग्रामस्थांना घ्यावयांस सांगितली.
या वाडीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने जंगल भागातुन ओढे - नाळे पार करत जावे लागते तसेच या ठिकाणी कोणतेही आपत्कालीन वाहने पोहचण्यांस मोठी समस्या निर्माण होत आहे.तसेच जाण्यासाठी दिड ते दोन तास पायी चालत जावे लागते.मात्र एखाद्या वेळी अशी घटना घडली तर तेथिल ग्रामस्थांच्या पर्यंत मदत कार्य पोहचण्यासाठी खूप वेळ जाइल या सर्व बाबीचा आभ्यास करुन अधिकारी वर्ग यांनी दिड ते दोन तास चालत जावून या ग्रामस्थांना या ठिकाणी धोका असून आपण आपल्या सुरक्षतेच्या दृष्टीकोणातून सुरक्षित स्थळी जावून रहावे तशी व्यवस्थाही करण्यात आली आहे.
या वाडीमध्ये २९ कुटुंबे असून पैकी १० कुटुंबे ही कामधंदा निमित्ताने बाहेर गावी असतात.मात्र या ठिकाणी आता १९ कुटुंबे राहत असल्यांचे बोलले जात आहे.यावेळी तहसीलदार स्वाती पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी माणगाव नितीन पोंदकुळे, पंचायत समिती गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे, पोलीस निरीक्षक कैलास डोंगरे, सर्कल ठाकर, तलाठी अनिकेत पाटील, प्रविण गवई, किशोर मालुसरे, ग्रामसेवक गिजे,विस्तार अधिकारी पुष्पा नेरकर,माजी सरपंच विठोबा घाडगे, स्थानिक ग्रामस्थ अदि उपस्थित होते
0 Comments