एक हात मदतीचा... एक मेका साह्य करु, अवघे धरु सुपतं !

 


एक हात मदतीचा... एक मेका साह्य करु, अवघे धरु सुपतं !     

  इर्शाळगड कोकण उद्योजक सामाजिक संस्था व माझी इरकली कस्टमर तसेच डोंबिवली ग्रुप यांच्या कडून चटई,चादर व अन्नधान्य किट वाटप 


दीपक जगताप 
खालापूर : २६ जुलै,
      
                इर्शाळगड येथे दरड पडल्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले.स्वताचे राहते घर या ढिगा-या खाली गाडली गेली.या मध्ये वाचलेल्या कुटुंब या धक्यातून अजूनही सावरले नाही.मात्र आता जे कुटुंब या मधून बचावले आहे.यांना अनेक ठिकाणी मदतीचा हात पुढे येत असल्याचे चित्र समोर येत आहे. संकट समयी एकमेकांना मदत करणे हाच उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून एक हात मदतीचा...या उद्दात विचारांतून ठाणे येथून आलेल्या कोकण उद्योजक सामाजिक संस्था व माझी इरकली कस्टमर तसेच डोंबिवली ग्रुप यांच्या कडून अन्नधान्य किट चादर ,चटई वाटप करण्यात आले.

                इर्शाळगड येथिल दुर्घटना ग्रस्तांना भेटता आले नाही ही खंत मनाली लागून गेली.त्यांच्यावर आज मोठ्याप्रमाणावर दु: खाचा डोंगर कोसळला असतांना,या मध्ये वाचलेल्या ग्रामस्थांची कहाणी ऐकतांना अंगाला शहारे निर्माण होत आहे.मात्र आपण आनलेली मदत त्यांच्या पर्यंत पोहचता यावी या विचारांतून त्यांनी नानिवली येथिल ग्रामस्थ यांच्याकडे सुफुर्त करण्यात आले.आपण आनलेली अन्नधान्य किट चटई,चादर ह्या वस्तू त्यांच्यापर्यंत पोहचली जाईल असे आश्वासन यावेळी त्यांनी भेट वस्तू आनलेल्या संस्थेला बोलले.
         

यावेळी  प्रितेश तावडे ,संभाजी पाटील 
पप्पू गावकर ,कविता पाटकर,वंदना मयेकर,तेजल कडू  डोबवली  ग्रुप यांनी सढळ हस्ते मदत केली.
तसेच तेजल महेश सोपारकर, महेश सोपारकर,दिशा सोपारकर,अभिषेक बरिदे,महेश जोशी,बिट्टू शर्मा,वैभव लांजेकर,आशिष लोखंडे यावेळी  चौक ग्रामपंचायत सदस्य निखिल मालुसरे,व्हाईस ऑफ मीडिया राष्टीय संघटना खालापूर तालुका अध्यक्ष दिपक जगताप उपस्थित होते




Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर