दहावी मध्ये उत्तुंग भरारी,आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते साहील गावंडे यांचा सत्कार


 दहावी मध्ये उत्तुंग भरारी,आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते साहील गावंडे यांचा सत्कार


पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
टेंभरी : २१ जुलै,
          
                 विद्यार्थ्यांची दहावी ही यशाची पहिली पायरी म्हणून ओळखले जात असते.या माध्यमातून मिळालेले गुण हे त्यांच्या भावी शिक्षणांसाठी खूप महत्वाचे ठरत असते.विद्यामंदिर सारंग या शाळेतील असलेला साहिल जयराम गावंडे ( टेंभरी ) यांनी दहावीच्या परीक्षेत ७९.८० टक्के मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केल्यामुळे कर्जत - खालापूर आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते नुकताच सत्कार समारंभ करण्यात आला.हा सन्मान म्हणजे त्यांनी घेतलेली मेहनतीचा प्रतिक असल्याचे बोलले गेले.
             

                साहिल जयराम गावंडे हा टेंभरी या ग्रामीण भागात राहत असून तो शाळेत खूप हुशार आणी मेहनती असल्यांचे शिक्षक यांच्याकडून सांगण्यात आले. तसेच विविध खेळामध्ये आवर्जून सहभाग नोंदविण्यांस तो अग्रेसर असे.आजचे पालक वर्ग मुलांना शाळेच्या व्यतिरिक्त बाहेर क्लासेस मुलांना देत असतात.मात्र साहिल यांनी कोणतेही शिकवणी न लावता शाळेत शिकविलेला आभ्यास घरीच करीत असे.घरची स्थिती उत्तम आहे.मात्र वडीलांचे छत्र हरपले असल्यामुळे आपण घरीच आभ्यास करावा हे त्यांनी मनाशी ठरविले.
                 साहिल यांने दहावी मध्ये द्वितीय क्रमांक मिळविल्यांने शिक्षकांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले.त्याच बरोबर टेंभरी गावातील ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या.यावेळी शिक्षक पंडीत पाटील,योजना म्हात्रे,शुभांगी शिंदे,मच्छिंद्र बारस्कर अदि शिक्षकांनी त्यास मार्गदर्शन केले.बी.डी.ठोंबरे,रामचंद्र ठोंबरे यांनी त्यांस आणी पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.




Post a Comment

0 Comments

अवघा रंग एक झाला,तळवली वारकरी यांच्याकडून पायी दिंडीचे आयोजन